प्रवासी तसेच आंतरराज्य मालवाहतुकीसाठी ई पासची गरज नाही; केंद्राचे स्पष्ट आदेश माय अहमदनगर वेब टीम

नवी दिल्ली - प्रवासी तसेच आंतरराज्य मालवाहतुकीसाठी कोणतीही बंधने असू नयेत, असे केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारेंना कळवले आहे. केंद्रीय राज्य सचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, विविध जिल्हा व राज्यांत स्थानिक पातळीवर हालचाल करण्यावर बंदी घातल्याचे समोर आले आहे.

अनलॉक-३ च्या मार्गदर्शक सूचनांकडे लक्ष वेधून भल्ला म्हणाले की, अशा प्रकारच्या निर्बंधांमुळे वस्तू व सेवांच्या आंतरराज्यीय वाहतुकीत अडचणी निर्माण होतात आणि पुरवठा साखळीवर त्याचा परिणाम होतो. यामुळे आर्थिक घडामोडी किंवा नोकरीमध्ये अडथळा निर्माण होतो. ते पत्रात म्हणाले की अनलॉक मार्गदर्शक तत्त्वांमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की आंतरराज्य व राज्यांमध्ये व्यक्ती किंवा वस्तूंच्या वाहतुकीवर कोणतेही बंधन असू नये.

मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असेही म्हटले आहे की, शेजारी देशांशी केलेल्या कराराअंतर्गत, सीमापार व्यापारासाठी व्यक्ती किंवा वस्तूंच्या हालचालीसाठी स्वतंत्र परवानगी, मंजुरी किंवा ई-परमिटची आवश्यकता नाही. तसे झाल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ च्या तरतुदींनुसार गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन आहे. ही बंदी घालू नये आणि 'अनलॉक मार्गदर्शक तत्त्वे' निश्चित केली पाहिजेत, अशी विनंती या पत्राद्वारे केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी २५ मार्चपासून लॉकडाउनची घोषणा केली. नंतर ते ३१ मे पर्यंत वाढविण्यात आले. यानंतर १ जूनपासून देशभरातील औद्योगिक उपक्रम आणि कार्यालये सुरू झाल्यापासून 'अनलॉक' ची प्रक्रिया सुरू झाली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post