शिवसेना उपनेते अनिल राठोड यांचा संघर्षमय जीवनप्रवास




माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - नगर शहरात सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्मलेल्या अनिल राठोड यांचा जीवनप्रवास अतिशय संघर्षमय होता. युवा वयात हिंदुत्ववादाकडे ते आकर्षित झाले. हिंदू एकता आंदोलनाच्या माध्यमातून त्यांचे कार्य सुरू झाले. हे करत असताना कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी त्यांनी चितळे रोडवरील नेता सुभाष चौकात ‘शितल पावभाजी व ज्यूस’ची गाडी सुरू केली. या ठिकाणी नेहमीच नागरिकांची वर्दळ असायची. व्यवसायाच्या माध्यमातून संपर्कात येणार्‍या तरुणांना हिंदूत्ववादाकडे आकर्षित करण्याचे काम त्यांनी व त्यांच्या सहकार्‍यांनी केले.

शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना हिंदुत्वाच्या मुद्यावर केली होती. नगर शहरासह जिल्ह्यात शिवसेनेला हवा तसा आक्रमक आणि कट्टर हिंदुत्ववादाचा चेहरा अनिल राठोड यांच्या रुपाने मिळाला. अनिल राठोड यांनी दहशतमुक्त, भयमुक्त नगरचं स्वप्न या शहरातील नागरिकांना दाखविले, नागरिकांना संरक्षण देण्यासाठी ते कायमच प्रयत्नशील राहिले. 1989 मध्ये राठोड शिवसेनेत सक्रीय झाले. आणि त्यांनी नगर शहरात शिवसेना रुजवायला सुरुवात केली. त्यांच्या या आक्रमकपणामुळे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1990 च्या विधानसभा निवडणुकीत राठोड यांना नगर शहर मतदारसंघातून उमेदवारी दिली आणि त्या निवडणुकीत राठोड यांनी तत्कालीन आमदार दादाभाऊ कळमकर यांचा पराभव केला. आमदार झाल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही.

शहर मतदारसंघात सलग पाच वेळा ते निवडून गेले. 1995 ते 1999 च्या युती शासनाच्या साडेचार वर्षाचा कालावधी वगळता सुमारे 20 वर्ष ते सत्तेबाहेर होते. विरोधी पक्षाचे आमदार असल्यामुळे त्यांना मतदारसंघात कामे करताना मोठा संघर्ष करावा लागला. या काळात अनेक प्रलोभने येवूनही ते शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले. ‘सच्चा शिवसैनिक’ म्हणून त्यांची प्रतिमा तयार झाली होती. त्यामुळेच 1995 च्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी राठोड यांचे तिकीट कापले जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाही स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी राठोड यांनाच उमेदवारी देत त्यांच्या एकनिष्ठपणावर शिक्कामोर्तब केले होते.

‘मोबाईल आमदार’ म्हणून होती ख्याती

सर्वसाधारणपणे एकदा आमदार झाल्यानंतर नेत्याचे राहणीमान बदलते. परंतु राठोड यांच्या बाबतीत तसे कधीच झाले नाही. सर्वसामान्यांच्या केवळ एका फोनवर त्यांच्या हाकेला धावून जात त्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचा राठोड नेहमीच प्रयत्न करायचे. विकास ही एक प्रक्रिया असते. प्रत्येक लोकप्रतिनिधीकडून ती होतच राहते परंतु त्या पलिकडेही जावून मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांचे संरक्षण करणे त्यांच्या सुख-दु:खात सहभागी होणे हेही लोकप्रतिनिधीचे कर्तव्य असते, अशी त्यांची धारणा होती. आणि त्याच पद्धतीने ते नागरिकांशी सतत संपर्कात राहत. त्यांचे प्रश्न सोडवत. त्यामुळेच सहकार आणि साखर सम्राटांच्या नगर जिल्ह्यात ‘मोबाईल आमदार’ म्हणून अनिल राठोड यांची ख्याती होती. जनतेच्या मनावर त्यांच्याविषयी असलेली आपुलकी कायम कोरली गेली. त्यामुळेच सलग 25 वर्षे त्यांनी नगर शहराचे प्रतिनिधीत्व केले. राजकारणात यश-अपयश, विजय-पराभव हे चालूच असते. त्यामुळे सलग 25 वर्षे आमदार राहिल्यानंतर सन 2014 च्या विधानसभा निवडणुकी त्यांचा आमदार संग्राम जगताप यांनी पराभव केला. मात्र या पराभवाने खचून न जाता त्यांनी त्यांची सर्वसामान्यांचा नेता म्हणून असलेली ओळख कायम ठेवली आणि ते शेवटच्या क्षणापर्यंत जनतेच्या प्रश्नासाठी संघर्षरत राहिले.

काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात फडकवला भगवा

स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात ‘लाल बावट्या’चा बालेकिल्ला असलेला नगर जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला झाला. वर्षानुवर्षे असलेली काँग्रेसची मक्तेदारी नगर शहरातून मोडीत काढण्याचे काम अनिल राठोड यांनी केले आणि काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा भगवा त्यांनी फडकवला. सुरुवातीच्या काळात त्यांचा आक्रमकपणा आणि संघटन वाढविण्याचे कौशल्य पाहून त्यांच्यावर शिवसेनेच्या उप जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी टाकण्यात आली होती. त्यानंतर ते आमदार झाले व त्यांनी नगर शहरात घराघरात शिवसेना पोहोचविण्याचे काम केले. त्यानंतर संपुर्ण जिल्ह्यातही शिवसेना वाढीसाठी त्यांचे मोठे योगदान राहिले. सहकार आणि साखर सम्राटांच्या जिल्ह्यात कुठलही मोठं आर्थिक पाठबळ नसताना केवळ जनतेच्या पाठींब्यावर राजकारण करत सलग पाच वेळा आमदार होण्याची किमया करणारे अनिल राठोड हे जिल्ह्यातील एकमेव नेते होते.

जनतेसाठी घेतले अनेक गुन्हे अंगावर

अनिल राठोड यांचे राजकीय जीवन कायमच संघर्षमय राहिले. विरोधी पक्षाचे आमदार असल्यामुळे त्यांना कायम जनतेच्या प्रश्नांसाठी मोर्चे, आंदोलने करावी लागली. या आंदोलनांमुळे त्यांच्यावर अनेकदा विविध प्रकारचे गुन्हेही दाखल झाले परंतु ते डगमगले नाहीत. जनतेच्या प्रश्नासाठी 

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post