अहमदनगर महापालिका संचालित रोटरी कोव्हिड केअर सेंटर मधून १०० रुग्ण बरे

 माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर: अहमदनगर महापालिका संचालित नगर शहरातील रोटरी क्लबच्या सौजन्याने सुरू केलेल्या रोटरी कोव्हिड केअर सेंटर येथून आज दिनांक ७ ऑगस्ट रोजी पर्यंत १०० रुग्णांवर उपचार पूर्ण झाल्याने, महापालिका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
महापालिका संचालित या रोटरी कोव्हिड केअर सेंटर मध्ये 120 कोरोना बाधित रुग्णांची व्यवस्था करण्यात आली असून, महापालिका मार्फ़त वैद्यकीय आणि रोटरी क्लबच्या वतीने ईतर अनेक सोय सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती यावेळी रोटरी क्लब सेंट्रल चे अध्यक्ष प्रसन्ना खाजगीवले यांनी दिली. या सेंटरमध्ये वाचनालय सुरू करण्यात आले असून रोटरी क्लब अहमदनगर मेन चे अध्यक्ष ॲड. अमित बोरकर यांच्या वतीने 100 पुस्तके आणि दररोज दैनिक वृत्तपत्रे देण्यात येत आहेत.
याशिवाय या सेंटर मध्ये हास्य क्लब, सकाळच्या वेळी व्यायाम, योगासने, गाणी ऐकण्यासाठी साऊंड सिस्टीम ची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती रोटरी क्लब ऑफ अहमदनगर इंटिग्रीटीचे अध्यक्ष रफिक मूनशी यांनी दिली.
श्री. धर्मेंद्र सोनग्रा हे या ठिकाणी रोज सकाळी ७ व ८ या वेळेत योगासन वर्ग घेणार आहेत. डॉ. प्रसाद उबाळे आणि डॉ. श्रेया खाजगीवाले यांच्या वतीने रुग्णांना आयुष्य काढा तसेच इतर आयुर्वेदिक औषधे विनामूल्य उपलब्ध करून दिले जात आहेत. डॉ. सुधा कांकरिया यांच्या टीम मार्फत मानसिक स्वास्थ (मेंटल हीलींग) साठी रुग्णांना समुपदेशन केले जात आहे.
सर्व रुग्णांना विवामपल्य जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून, दिवसातून दोन वेळा चहा, सकाळी नाश्ता, आणि दोन वेळचे जेवण दिले जात आहे. हा संपूर्ण आहार पौष्टिक, सकस आणि रोगप्रतिकार शक्ती वर्धक असावा याकडे पूर्ण लक्ष देण्यात येत आहे अशी माहिती रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शनी च्या अध्यक्षा सौ. गीता गिल्डा यांनी दिली.
सदर रोटरी कोव्हिड केअर सेंटर हे एक आदर्श सेंटर बनवण्याच्या दृष्टीने महापालिका आणि रोटरी प्रयत्न करत असून, हे सेंटर मानवतेच्या भावनेतुन पंप र्णपणे विनामूल्य असल्याने शहरातील अनेक गरजू रुग्णांची या ठिकाणी सोय झाली आहे व त्याबद्दल या ठिकाणी दाखल रुग्ण हे रोटरीच्या ह्या विनामुल्य कार्यास मनापासुन शुभेच्छा देत आहेत. डॉ. सतीश राजूरकर यांच्या वैद्यकीय मार्गदर्शनाखाली काम करत असलेल्या या सेंटर मधून आज पर्यंत १०० रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला, तसेच सर्व रोटरी क्लब ने एकत्र येऊन सुरू केलेल्या आरोग्य सेवेचं हे पहिलं यश अशी प्रतिक्रिया यावेळी रोटरीचे सर्व सेक्रेटरी पुरषोत्तम जाधव, दिगंबर रोकडे, ईश्वर बोरा, सुयोग झंवर, देविका रेले व सर्व
सभासदांनी व्यक्त केली.
या उपक्रमास नगर शहरातील जास्तीत जास्त संस्था, नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन रोटरी मिडटाऊन चे अध्यक्ष क्षितिज झावरे यांनी केले आहे.
रोटरी कोव्हिड केअर सेंटर या विनामूल्य आरोग्य सेवा पुरवणाऱ्या उपक्रमासाठी अहमदनगर रोटरी क्लबचे सर्व पदाधिकारी, सदस्य यांचे सहकार्य मिळत आहे.
कोवीड  विरुद्धचा हा लढा आपल्याला सगळ्या नागरिकांना एकत्र येऊन लढून जिंकावा लागणार असून त्यासाठी संघटित होऊन प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, आणि रोटरी हेच कार्य अहमदनगर येथील आय लव नगर, जैन ओसवाल युवक संघ, वंदे मातरम् युवा प्रतिष्ठान, इनर व्हील ऑफ अहमदनगर विनस, विजेता क्रिकेट क्लब, इंटेरियर डेकोरेटर असोसिएशन, आय आय डी या संस्थांना सोबत घेवुन करत असल्याची भावना यावेळी महापालिका आयुक्त श्री. श्रीकांत मयकलवार यांनी व्यक्त केली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post