माय अहमदनगर वेब टीम
कोरोना संसर्गामुळे केस गळू शकतात, असा निष्कर्ष ३८ देशांच्या १००० कोरोना संसर्गित लोकांच्या अभ्यासावरून काढण्यात आला आहे. हे संशोधन डॉ. नतालिया लेबर्ट आणि इंडियाना स्कूल ऑफ मेडिसिन यांनी केले आहे. कोरोना संसर्गापासून बरे झाल्यावर रुग्णाचे केस झपाट्याने गळू लागतात, असे टीमच्या निर्दशनास आले. मेरीलँडमधील जॉन्स हॉपकिन्स सेंटर फॉर हेल्थ सिक्युरिटीचे ज्येष्ठ अभ्यासक अमेश ए. अडलजा यांच्या म्हणण्यानुसार, याला टेलोजेन इफ्लुव्हियम म्हणतात. अडालाजा यांच्या म्हणण्यानुसार, संसर्गाच्या दरम्यान शारीरिक ताणामुळे केसांच्या रोमांची वाढ थांबते. या क्रियेस टेलोजेन इफ्लुव्हियम म्हणतात. मलेरिया आणि क्षयरोग यांसारख्या आजारांमध्ये असे दिसून येते. टेलोजेन एफ्लुव्हियमची लक्षणे सहसा तणावाच्या सुमारे तीन महिन्यांनंतर दिसून येतात. महिला आणि पुरुष दोघांमध्येही अशी लक्षणे समान दिसून येतात.
कोरोनाचा तणाव आहे मुख्य कारण
त्वचातज्ज्ञ अँजेलो लँड्रासिना यांच्या मते, कोरोना संसर्गामुळे उद्भवणाऱ्या ताणामुळे असे होते. एखादी व्यक्ती जेव्हा तणाव घेते तेव्हा हार्मोन कार्टिसोल रिलीज होतो. यामुळे केसांच्या रोमांच्या प्रक्रियेवर परिणाम होतो, त्यामुळे केस गळतात. अँजेलो यांच्या मते, कोरोनाने संसर्गित व्यक्तीला आयसीयूमध्ये दाखल केले तर त्याला टेलोजेन एफ्लुव्हियम होण्याचा धोका असतो.
Post a Comment