नागरिकांनी लाडक्या बाप्पाचे घरीच विसर्जन करावे ः आ. संग्राम जगताप



कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात 17 ठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती

माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर : शहरामध्ये कोरोना संसर्ग विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी आपआपल्या आरोग्याची काळजी  घ्यावी. गणेश विसर्जनच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात सामूहिक गर्दी होत असते. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याची भीती आहे. तरी नगरकरांनी आपल्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन भक्तीभावाने घरीच करावे. तसेच अहमदनगर महानगरपालिकेने प्रत्येक प्रभागामध्ये गणेश विसर्जनासाठी गाडीची व्यवस्था केलेली आहे. प्रत्येक प्रभागामध्ये आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी गाडी घरी येणार आहे. तसेच नगर शहरामध्ये 17 ठिकाणी कृत्रिम तलाव तयार केले आहे. 1 लाख लीटर पाण्याची क्षमता असलेले हे तलाव आहे. यामध्ये कल्याण रोडवरील बाळाजी बुवाची विहीर, पाईपलाईन रोडवरील यशोदानगर मधील विहीर, बोल्हेगाव गांधीनगर रोडवरील भारत बेकरी चौक मनपाची खुली जागा, वडगाव गुप्ता रोड, मयूर कॉर्नर चौक खासगी जागा, भिस्तबाग, तपोवनरोड, नानाचौक खासगी जागा, निर्मलनगर साईबाबा मंदिर, खुली जागा, गंगा उद्यान, मिस्कीन मळा, भिंगार नाल्यालगत सारसनगर, पुलाशेजारी खासगी जागा, बुरुडगाव रोड, साईनगर उद्यान, स्टेशनरोड लोखंडी पुलाशेजारी सीना पात्रातील रिकामी जागा, केडगाव लिंकरोड, क्रांती चौकाजवळील खासगी जागा, केडगाव मोतीनगर, बुद्धविहार शेजारील खुली जागा, केडगाव देवी मंदिरासमोरील खुली जागा आदी ठिकाणी सुविधा उपलब्ध केलेली आहे. तरी नगरकरांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सहकार्य करावे, तसेच अटी व शर्तींचे पालन करावे. प्रत्येकाने मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सिंगचा वापर करावा, असे आवाहन आ. संग्राम जगताप यांनी केले. यावेळी नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, गजेंद्र भांडवलकर, इंजिनिअर श्रीकांत निंबाळकर आदी उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post