क्रिकेटपटू सुरेश रैनाच्या कुटुंबावर प्राणघातक हल्लामाय अहमदनगर वेब टीम

नवी दिल्ली - पंजाबच्या पठाणकोट जिल्ह्यात राहणाऱ्या सुरेश रैनाच्या काकांच्या कुटुंबावर शुक्रवारी रात्री दरोडेखोरांनी हल्ला केला होता. या प्राणघातक हल्ल्यात रैनाच्या काकाच्या निधन झाले. तर काकीसह कुटुंबातील चार जण जखमी झाले आहेत. याच कारणामुळे रैनाने आयपीएलमधून माघार घेत भारतात परतल्याचे बोलले जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुख्यात ''काले कच्छेवाला'' टोळीचे तीन ते चार दरोडेखोर चोरीच्या उद्देशाने आले होते. पठाणकोटमधील माधोपूरजवळील थारियाल गावात राहणाऱ्या अशोक कुमार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर टोळीने हल्ला केला. हल्ल्याच्या वेळी कुटुंबातील सर्व जण आपल्या घराच्या गच्चीवर झोपले होते. 58 वर्षीय अशोक कुमार यांच्या डोक्याला मार लागल्याने त्याच रात्री त्यांचा मृत्यू झाला. तर अशोक कुमार यांच्या 80 वर्षीय मातोश्री सत्या देवी, पत्नी आशा देवी, मुले अपिन आणि कौशल जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. घरातील काही रोकड आणि सोने लुटून दरोडेखोरांनी पळ काढला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post