छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ दिवसात बसवणार ; कर्नाटक सरकार


माय अहमदनगर वेब टीम

बेळगाव - बेळगावातील मणगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यावरून वातावरण तापले होते. राज्यातील अनेक जिल्ह्यात या घटनेचे पडसाद उमटले होते. त्यानंतर आथा शिवाजी महाराजांचा पुतळा आठ दिवसांत पुन्हा बसवून देण्याचे आश्वासन कर्नाटक सरकारने दिले आहे. पुतळा हटवल्याच्या संतापजनक प्रकारानंतर मणगुत्तीपासून संपूर्ण महाराष्ट्रात याचे पडसाद दिसून आले.


बेळगाव जिल्ह्यातील मणगुत्ती गावात बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बेळगाव जिल्हा प्रशासनाने रातोरात हटवल्यानंतर महाराष्ट्रात या घटनेचे पडसाद जागोजागी उमटले आहेत. औरंगाबाद, हिंगोली, नागपूरसह अनेक ठिकाणी भाजप आणि कर्नाटक सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर, कायदेशीर बाबींची पूर्तता करून आठ दिवसात पुतळा बसवण्याचा बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, आठ दिवसात महाराजांचा पुतळा बसवला नाही, तर नवव्या दिवशी गावकरी पुतळा बसवणार, असा निर्णय पोलिस प्रशासन, सामाजिक संघटना आणि ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post