अल्मिको साहित्यामुळे विदयार्थ्यांना शिक्षण सुलभ : सभापती कोकाटे


 नगर पंचायत समितीत  दिव्यांगांना साहित्य वाटप 

माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर - अल्मिको साहित्यामुळे विविध गरजाधारक विदयार्थ्यांना  शिक्षण सुलभ होईल व त्यांच्या शिक्षणातील उत्साह वाढेल असा विश्वास पंचायत समिती सभापती कांताबाई कोकाटे यांनी व्यक्त केला. 

नगर पंचायत समितीच्या आयइडी कक्षातर्फे तालुक्यातील विशेष गरजा धारक विद्यार्थ्यांना सोशल डिस्टंगसीनचे पालन करत 

साहित्य वाटप करण्यात आले, यावेळी त्या बोलत होत्या. यामध्ये 18 वर्ष वयोगटातील 17 विदयार्थ्यांना व्हीलचेअर,  सी. पी. चेअर, एम. आर. किट, कुबड्या, तीन चाकी सायकल, श्रवणयंत्र आदींचे वाटप करण्यात आले. यावेळी हितेन कांबळे, किशोर फुलमाळी, करण गायकवाड, अभिजित भिंगारदिवे, अक्षरा दुधारे, आदी विदयार्थ्यांच्या पालकांशी सभापती कांताबाई कोकाटे, उपसभापती रवींद्र भापकर, माजी सभापती रामदास भोर, प्रवीण कोकाटे  यांनी संवाद साधला. याप्रसंगी शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे, यांनी तालुक्यातील आयइडी कक्षाच्या कामकाजाचा आढावा घेऊन समाधान व्यक्त केले. उपशिक्षणाधिकारी अरुण धामणे, गटशिक्षणाधिकारी रवींद्र कापरे यांनी सूत्रसंचालन केले तर प्रवीण कोकाटे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. यावेळी सोशल डिस्टंगसीनचे पालन करत साहित्य वाटप करण्यात आले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post