खेलरत्न पुरस्कारासाठी मिळणार 7.5 लाख ऐवजी आता 25 लाख

 

माय अहमदनगर वेब टीम

नवी दिल्ली - क्रीडा मंत्रालय राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराच्या बक्षीस रकमेत मोठी वाढ करणार आहे. खेलरत्नसाठी खेळाडूंना ७.५ लाख ऐवजी २५ लाख रुपये मिळतील. जवळपास ३०० टक्के वाढ झाली आहे. खेळाडूंनी बक्षीस रक्कम कमी असल्याचे म्हटल्यानंतर हे पाऊल उचलले. २००९ नंतर बक्षीस रकमेत वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर अर्जुन पुरस्कारासाठी ५ ऐवजी १५ लाख, द्रोणाचार्य पुरस्कारासाठी ५ लाखऐवजी १० लाख आणि ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कारासाठी ५ एेवजी १५ लाख रुपये दिले जाईल. यंदा एकूण ६६ खेळाडूंना २९ ऑगस्ट रोजी सन्मानित केले जाणार आहे. त्याचे संपूर्ण नियोजन तयार करण्यात आले आहे.


२९ ऑगस्ट क्रीडा दिनी त्याची घोषणा करण्यात येईल. यावर्षी ६२ खेळाडू व प्रशिक्षकांचा सन्मान करण्यात येणार आहे. यंदा खेलरत्नसाठी क्रिकेटपटू रोहित शर्मा, महिला हॉकीपटू राणी रामपाल, टेबल टेनिसपटू मणिका बत्रा आणि रियो पॅरालिम१पिक सुवर्ण विजेता उंच उडीपटू मरियप्पयनची निवड करण्यात आली. त्याचबरोबर २९ जणांना अर्जुन पुरस्कार, १३ जणांना द्रोणाचार्य व १५ जणांना ध्यानचंद पुस्काराने गौरवण्यात येईल.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post