तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार ; जाणून घ्या

 

माय अहमदनगर वेब टीम

शनिवार 22 ऑगस्ट रोजी चंद्राच्या स्थितीमुळे साध्य आणि रवियोग जुळून येत आहे. या 2 शुभ योगाच्या फायदा 12 पैकी 7 राशीच्या लोकांना होईल. जॉब आणि बिझनेसमध्ये या राशीच्या लोकांना पुढे जाण्याची संधी मिळू शकते. वरिष्ठांची मदत मिळेल आणि धनलाभही होऊ शकतो. इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देण्यासाठी राहील.


येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...


मेष : शुभ रंग : हिरवा | अंक : ५

आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागेल.खाण्यावर नियंत्रण गरजेचे आहे. रुग्णांनी पथ्य सांभाळावे.


वृषभ : शुभ रंग : केशरी | अंक : १

कौटुंबिक सुखात वृद्धीच होईल. वाहन, वास्तुविषयी खरेदी विक्री फायद्यातच राहील. तरुण मंडळी आज बेफिकीरपणे वागतील. मुलांचे अती लाड नकोत.


मिथुन : शुभ रंग : सोनेरी|अंक : ७

आज कौटुंबिक समस्यांवर लक्ष केंद्रित कराल. गृहिणींना गृहोद्योगातून चांगली कमाई होईल.तरुणांनी गैरवर्तन टाळावे. प्रेम प्रकरणात फसगत.


कर्क : शुभ रंग : पिस्ता|अंक : ८

जास्त वेळ घराबाहेरच जाईल. विद्यार्थ्यांनी परिश्रम वाढवायला हवेत. यश वाटते तितके सोपे नाही.


सिंह :शुभ रंग : केशरी|अंक : ८

व्यवसायात उत्तम यश मिळून स्वत:चे वेगळेच स्थान निर्माण कराल. आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल.


कन्या : शुभ रंग : पांढरा|अंक : ६

स्वत:चेच खरे करण्याकडे अाज तुमचा कल राहील. तुमच्याकडून आपलीच माणसे दुखावली जातील.


तूळ : शुभ रंग : मोरपिशी | अंक : ५

दूरचे नातलग संपर्कात येतील. मोठेपणा घेण्यासाठी खर्च कराल. थोरांचे मानपान सांभाळावे लागतील.


वृश्चिक : शुभ रंग : जांभळा | अंक : ९

तुमचा उंची राहणीमानाकडे कल राहील. यशस्वी व्यक्तींच्या सहवासात तुमचे विचार प्रगल्भ होतील.


धनू : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : १

आज भावनेपेक्षा कर्तव्यास जास्त प्राधान्य द्याल.नोकरीत काही मनाजोगत्या घटना घडतील. ध्येय साध्य होतील.


मकर : शुभ रंग : चंदेरी | अंक : ३

काही बिकट प्रसंग यशस्वीपणे हाताळाल. प्रामाणिक मेहनतीस आज नशिबाची साथ मिळेल.


कुंभ : शुभ रंग : गुलाबी | अंक : २

आज काही अप्रिय माणसांचा सहवास सहन करावा लागेल. कुणाकडूनही सहकार्याची अपेक्षा नकोच.


मीन : शुभ रंग : मरून | अंक : ४

आज आवक-जावक सेम सेमच राहील. गृहिणी चारचौघीत झालेल्या कौतुकाने आनंदीत होतील. जोडीदाराशी एकमत राहील.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post