माय अहमदनगर वेब टीम
पुणे - जिल्ह्यात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सातत्यपूर्ण स्वच्छता, मास्कचा वापर व सुरक्षित अंतर व शासनाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. मास्क न वापरणारे, सुरक्षित अंतराचे पालन न करणारे तसेच निष्कारण गर्दी करणार्यांवर कारवाई करा, असे आदेश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. या आदेशानंतर विनामास्क नागरिकांना 500, तर सार्वजनिक ठिकाणी थुंकताना आढळल्यास 1 हजार रुपये दंड वसूल करा, असे आदेश विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. दंड वसूल करण्याचे अधिकार पोलिस, पोलिस मित्र, आरोग्य सेवक, महापालिका कर्मचारी यांना दिले आहेत.
कोरोना विषाणू उपाययोजनांबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसमवेत शुक्रवारी अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील उपस्थित होते. विधान परिषदेच्या उपसभापती आमदार डॉ. नीलम गोर्हे, खासदार सुप्रिया सुळे, खासदार श्रीरंग बारणे, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कोरोना प्रतिबंधासाठीच्या उपाययोजना करताना ग्रामीण भागात समन्वयासाठी स्वतंत्रपणे अधिकार्यांची नेमणूक करावी, असे आदेश पवार यांनी दिले. दिलीप वळसे-पाटील म्हणाले, ग्रामीण भागातील रुग्णालयांतील आवश्यक सोयीसुविधांची वाढ करावी, तसेच ग्रामीण भागातील रुग्णांसाठी खाटांची उपलब्धता असावी. कोरोना प्रतिबंधासोबतच उपचाराच्या सुविधांबाबत दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्ण, कोरोनामुक्त झालेले रुग्ण, तसेच कोरोना संसर्गविषयक सद्य:स्थिती, आरोग्य सुविधा आणि उपलब्ध सामग्रीबाबत माहिती दिली.
Post a Comment