वीज बिलाचा शाॅक; राज ठाकरे आक्रमक


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - राज्यातील वीज ग्राहकांना भरमसाठ वीज बिल (Electricity Bill) आकारण्यात आले आहे. यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अधिक आक्रमक झाली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी याची गंभीर दखल घेतली असून वीज आकारणीला तात्काळ चाप लावा. अन्यथा करोना असला मनसे गप्प बसणार नाही, असा जाेरदार इशारा राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून दिला आहे.

राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, करोनाच्या या लढाईत राज्य सरकारचे महत्त्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष केले आहे. या विषयावर जनतेच्या भावना तीव्र आहे. त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरकारचे लक्ष वेधून घेऊ इच्छिते. महावितरण किंवा खाजगी वीज कंपन्यांनी राज्यातील वीजग्राहकांना वीजबिलांचा जबरदस्त शॉक दिला आहे. ग्राहकांना अवाजवी बिले पाठविण्यात आली आहेत. मार्च, एप्रिल, मे महिन्यांची सरासरी वीज बिले पाठवल्यानंतर त्या तीन महिन्यांत विजेचा झालेला वापर आणि सरासरी विजेची बिले यांच्यातील तफावत जून-जुलै महिन्यात ग्राहकांच्या माथी मारण्यात येत आहे. तफावतीच्या नावाखाली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post