अकरावी प्रवेश; नवे वेळापत्रक जाहीर




माय अहमदनगर वेब टीम
नाशिक - अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना नोंदणी अर्ज करण्याची आणि अर्जाचा भाग एक भरण्याची सुविधा येत्या २६ जुलैपासून उपलब्ध करून दिली जाणार आहे. शिक्षण विभागाच्या वतीने अकरावी प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक मंगळवारी उशीरा जाहीर करण्यात आले आहे.

नाशिक महापालिका क्षेत्रासह मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद, अमरावती, नागपुर महापालिका क्षेत्रात या सुधारित वेळापत्रकानुसार अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येईल, असे आदेश शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालकांना दिले आहेत. करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला असून संपूर्ण प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ मिळालेली आहे.

सुधारित वेळापत्रक पुढीलप्रमाणे

उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करण्याची मुदत २२ जुलैपर्यंत असेल. तर उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी भरलेली माहिती तपासून ऑनलाईन प्रमाणित करण्याची प्रक्रिया २४ जुलैपर्यंत विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत राबविली जाणार आहे.

यानंतर विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्जाचा भाग एक भरण्याच्या प्रक्रियेला सुरवात होईल. अर्जाच्या भाग एकमध्ये वैयक्तिक स्वरूपाची माहिती भरण्यासह मार्गदर्शन केंद्र निवडणे आणि आपले अर्ज व्हेरीफाईड झाला आहे, याची खात्री करण्यासासाठीची प्रक्रिया २६ जुलैपासून सुरू होणार आहे.

तर दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना महाविद्यालय, शाखा निवडीकरीता आवश्यक असलेला भाग दोन भरता येणार आहे. दरम्यान विद्यार्थ्यांनी ऑनलाइन भरलेला अर्जातील माहिती, भाग एक ऑनलाइन तपासून व्हेरीफाय करण्यासाठी संबंधित शाळा, मार्गदर्शन केंद्रांची प्रक्रिया २७ जुलैपासून सुरू होणार आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post