'शिवसेनेसोबत एकत्र निवडणुका लढवण्याचा प्रश्नच नाही'
माय अहमदनगर वेब टीम
पुणे - आम्ही शिवसेनेसोबतत जाणाच्या प्रश्नच नाही. पुढच्या निवडणुका भाजप स्वबळावर लढवणार असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगीतले. काही दिवसांपूर्वी पाटील यांनी राज्याच्या हितासाठी शिवसेनेसोबत एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यास तयार असल्याचे वक्तव्य केले होते. यावरून चंद्रकांत पाटील यांनी आज (दि. ३०) वक्तव्यावरून युटर्न घेतला आहे. 
शिवसेनाच काय इतर कुठल्याही पक्षाला आमचा सरकार स्थापनेसाठीचा कुठलाही प्रस्ताव नाही, असे पाटील म्हणाले. पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. मी केलेले वक्तव्य उलटे वाचले गेले आहे. उद्या आमचे सरकार आले तर सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, सर्व विधानसभा, लोकसभा आम्ही स्वबळावरच लढणार आहोत.
चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याने भाजपमध्ये मतमतांतर झाली होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पाटील यांचे वक्तव्य काळाच्या ओघात गेले असल्याचे सांगीतले. तसेच भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत संवाद साधताना पुढील निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी करण्याची सूचना दिल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केले होते.

राज्यातील निवडणुकीला अजून चार वर्षाचा कालावधी आहे. निवडणुका होतील तेव्हा स्वतंत्रपणे लढल्या जातील. त्यानंतर राज्याच्या हितासाठी शिवसेने, भाजप एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यासाठी तयार आहोत. असे वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर येथे केले होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post