आनंदाची बातमी ; कोरोना लसीची मानवी चाचणी सुरु


माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - देशाच्या पहिल्या करोना लसीची (कोव्हॅक्सिन) माणसांवर चाचणी करण्यास सुरुवात झाली आहे. पटना येथील एम्समध्ये प्रयोग सुरु आहेत अशी माहिती इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे (आयसीएमआर) संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी दिली आहे. कोव्हॅक्सिन ही लस हैदराबादची कंपनी भारत बायोटेकने आयसीएमआरच्या सहकार्याने बनविली आहे.

यासाठी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (एनआयव्ही) करोनाचा स्ट्रेन उपलब्ध करून दिला होता. पटना एम्स (अखखचड-झरींपर) मध्ये या औषधाच्या चाचणीसाठी हॉस्पिटलने निवडलेल्या 10 जणांवर कोव्हॅक्सिनची चाचणी करण्यास सुरुवात केली आहे. यानुसार करोनाच्या या लसीचा पहिला डोस या रुग्णांना देण्यात आला असून यावर निरिक्षणे नोंदविण्यात येत आहेत. यानंतर 14 दिवसांच्या फरकाने दुसरा डोस दिला जाणार आहे.

नियोजित वेळापत्रकानुसार या 10 जणांची वेळोवेळी तपासणी केली जाणार आहे. लस घेतल्यानंतर त्यांच्यावर होणारे चांगले-वाईट परिणाम पाहिले जाणार आहेत. आयसीएमआरने कोव्हॅक्सिनच्या चाचणीसाठी निवडलेल्या 12 संस्थांपैकी पटनाचे एम्स एक आहे. पटना एम्सचे अधीक्षक डॉ. सीएम सिंग यांनी आधीच वृत्तपत्रांना सांगितले होते की, करोनाची लस ही 22 ते 50 वयोगटातील सुदृढ लोकांवरच वापरून पाहिली जाणार आहे. यामध्ये महिला आणि पुरुषही असणार आहेत.

भारत बायोटेकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. कृष्णा इल्ला यांनी टाईम्स नाऊला सांगितले, डअठड-उेत-2 विषाणूविरोधात कोव्हॉक्सिन परिणामकारक ठरण्याचा विश्वास आहे. भारत बायोटेक (इहरीरीं इळेींशलह) 200 दशलक्ष लसी बनविण्याच्या तयारीला लागली आहे. ही कोव्हॅक्सिन लस हैदराबादच्या जिनोमी व्हॅलीतील प्रकल्पामध्ये बनविण्यात येत आहे. प्राण्यांवर या लसीचे चांगले परिणाम दिसून आले आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post