ब्राझिलिया - चीनबाबत अमेरिकेने पुन्हा एकदा कडक भूमिका घेतलेली दिसून आली आहे. ब्राझिलमध्ये पुढील वर्षी 5-जी नेटवर्कसाठी टेंडर प्रसिद्ध करणार आहे. हे कंत्राट चीनच्या हुवेई कंपनीला देऊ नका, असे आवाहन अमेरिकेने ब्राझिलला केले आहे. हुवेई कंपनीला हे कंत्राट दिले, तर अमेरिका-ब्राझिलमधील संबंधांवर त्याचा परिणाम होईल आणि ब्राझिलला याचे परिणाम भोगावे लागतील, असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.
ब्राझिलमधील राष्ट्राध्यक्ष जाएर बोल्सोनारी यांचे सरकार 5 जानेवारी रोजी 5-जी नेटवर्क सुरू करणार आहे. त्यासाठी टेंडर प्रक्रिया सुरू झाली आहे. यात चीनची हुवेई कंपनी आघाडीवर असल्याचे समजते. मात्र, या कंपनीवर माहिती चोरी आणि माहिती चीनला पुरविण्याचा आरोप आहे. हुवेईला हे कंत्राट मिळू नये, यासाठी अमेरिका ब्राझिलवर दबाव टाकत आहे. ब्राझिलकडे स्वीडनच्या एरिक्शन, फिनलँडच्या
Post a Comment