निर्जंतुकीकरणाचे ‘प्रकाशमान’ तंत्रमाय अहमदनगर वेब टीम
हेल्थ डेस्क - कोरोना व्हायरसच्या संकटामुळे सध्या जगभरात स्वच्छता, निर्जंतुकीकरण यांचे महत्त्व कधी नव्हे इतके वाढले आहे. आता त्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापरही सुरू करण्यात येत आहे. त्यामध्येच ‘अपर रूम अल्ट्राव्हायलेट जर्मी सायडल इर्रेडिएशन’ या तंत्राचा समावेश आहे. सूर्यप्रकाशाने किंवा त्यामधील अतिनील किरणांच्या सहाय्याने घर, दुकान किंवा कार्यालयीन इमारतींमधील जीवाणू, विषाणू, बुरशी किंवा अन्य सूक्ष्म जीवजंतू नष्ट केले जातील.

हार्वर्ड मेडिकल स्कूलमधील ग्लोबल हेल्थ अँड सोशल मेडिसिनचे प्राध्यापक डॉ. एडवर्ड नॉर्डेल यांनी याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, हे तंत्र कसे काम करील याबाबत आधी साशंकता होती. मात्र, ते परिणामकारकरीत्या काम करू शकते असे दिसून आले आहे. सूर्यप्रकाश निश्‍चितच ‘डिसइन्फेक्टंट’ च्या रूपाने काम करू शकतो. विशेषत: त्यामधील अतिनील किरणे (अल्ट्राव्हायलेट रेज) हवेत तरंगणार्‍या सूक्ष्म जीवजंतूंना नष्ट करण्यासाठी उपयुक्त आहेत. आतापर्यंत हे तंत्र न वापरण्याचे काय म्हणजे लहानपणापासूनच आपल्याला शिकवण्यात आले आहे की अतिनील किरणे माणसासाठी धोकादायक आहेत आणि त्यामुळे त्वचेचा कर्करोग होण्याचा संभव असतो.

दुसरे कारण म्हणजे ही पद्धत थोडी महागडीही आहे. एखाद्या मध्यम आकाराच्या वेअरहाऊसमध्ये जर या तंत्राचा वापर करण्यात आला तर किमान 75 लाख रूपयांचा खर्च येईल. त्यामध्ये वीज आणि देखभालीचा खर्च वेगळाच असेल. त्यामुळे छोट्या व्यापार्‍यांना ते परवडणारे नव्हते. मात्र, आता ते स्वस्त आणि सुरक्षित बनवण्यात येत आहे. न्यूयॉर्कच्या आंतराष्ट्रीय विमानतळावर त्याचा वापर अलीकडेच सुरू करण्यात आला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post