हे आहेत, बहुगुणी बदामाचे फायदे
माय अहमदनगर वेब टीम
हेल्थ डेस्क -जेव्हा पौष्टिक अन्नाचा विषय समोर येतो तेव्हा आपण सुकामेवा विचारात घेत नाही, मात्र सुक्यामेव्यातील बदाम हा दुर्लक्षित करण्यासारखा नाही. प्रत्येकाच्या घरी कमी-जास्त प्रमाणात उपलब्ध असलेले बदाम हे किती गुणकारी असतात याची बहुतेकांना कल्पना नाही. आयुर्वेद, युनानी आणि सिध्द शास्त्रानुसार बदाम हा सुकामेवा दृष्टी सुधारण्यासाठी सर्वाधिक गुणकारी आहे. भूक मंदावणे, मासिक पाळीतील त्रास, मलावरोध त्याचबरोबर अर्धांगवायू आणि पाल्सी या विकारांवर आयुर्वेद हा जालीम उपाय आहे. ही तीन वैद्यकीय शास्त्रे निरनिराळी आहेत, परंतु या तिन्हीमध्ये बदामाची उपयुक्तता मात्र समानतेने वर्णिली आहे.
ट्रान्स डिसिप्लीनरी युनिव्हर्सिटी या विद्यापीठात संशोधन करणारे डॉक्टर पद्म व्यंकट सुब्रमण्यम आणि डॉ. सुब्रमण्य कुमार या दोघांनी बदामावर सविस्तर संशोधन केलेले आहे. त्यांच्या अभ्यासाचे निष्कर्ष मोठे उत्तेजक आहेत. आयुर्वेद आणि युनानी उपचार पध्दतीमध्ये बदामांमुळे पुरुषांतील प्रजनन क्षमता वाढते, असे म्हटलेले आहे. त्याशिवाय पुरुषांमध्ये कमी होत चाललेली लैंगिक भूक वाढवण्याचीही क्षमता बदामामध्ये असते. पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर आणि लैंगिक भूकेवर आजच्या काळात गंभीर परिणाम झालेला आहे. त्यामुळे आजतरी बदामाची गरज जाणवत आहे.
Post a Comment