पेरूइतकीच पेरूची पानेही गुणकारी, जाणून घ्या फायदे
माय अहमदनगर वेब टीम
हेल्थ डेस्क - मधुमेहामध्ये रक्तातील वाढलेली साखर कमी होण्यासाठी पेरूच्या पानांचा रस अतिशय उपयुक्त असतो. एका अभ्यासानुसार हा रस नियमित घेतल्यास रक्तातील वाढलेली साखर कमी होण्यासाठी निश्चितच उपयोगी होतो.

वजन कमी करण्यासाठीही पेरूची पाने उपयुक्त असतात. शरीरातील फॅट्स वाढविणा-या घटकांवर नियंत्रण येण्यासाठी पेरूची पाने खाल्ल्यास फायदा होतो. याचे चूर्ण घेतल्यास त्याचा फायदा होतो. त्यामुळे लठ्ठपणावरही हा एक उत्तम उपाय होऊ शकतो.

शरीरात विविध कारणांनी झालेल्या गाठींवरील उपाय म्हणूनही पेरूच्या पानांचा वापर केला जातो. दुखणा-या गाठींवर पेरूच्या पानांची पेस्ट करून ती लावल्यास त्याचा चांगला उपयोग होतो. त्यामुळे आलेली सूज कमी होण्यासही मदत होते.

काहींना अंगावरून पांढरं जाण्याचा त्रास असतो. हे पांढरे प्रमाणात गेले तर ठिक, पण ते जास्त जात असल्यास त्यावर योग्य ते उपचार करावे लागतात. पेरूची पाने या समस्येसाठीही अतिशय उपयुक्त असतात. रोज सकाळ संध्याकाळ या पानांचा रस घेतल्यास त्याचा ही समस्या कमी होण्यासाठी फायदा होतो.

डायरियाच्या आजारावरही पेरूची पाने उपयुक्त ठरतात. लहान मुलांना डायरिया झाल्यास त्यांना या पानांचा रस द्यावा. पोटाच्या इतरही समस्यांवर याचा उपयोग होतो. एक कप पाण्यात ही पाने टाकून ती उकळावीत. त्याचा रस गाळून तो प्यायल्यास फायदा होतो. पचनशक्ती सुधारण्यास मदत होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post