आंतरराष्ट्रीय विमानसेवा लवकरच ?माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे सुरू करण्याबाबत भारताकडून बोलणी सुरू झाली असून, अमेरिका, कॅनडा आणि मध्य-पूर्व देशांकडे सेवा सुरू करण्यासंदर्भातील चर्चा पुढील टप्प्यात पोहोचली आहे. विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष अरिंवद सिंह यांनी याबाबत माहिती दिली.

कोरोना प्रादुर्भावामुळे तीन महिन्यांपूर्वी भारत सरकारने विदेशातील विमानसेवा बंद केली होती. आता सरकारने आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिका, कॅ नडा आदी देशांसोबतची चर्चा पुढील टप्प्यात पोहोचली आहे. असे असले तरी भारतातील प्रत्येक राज्यात कोरोनासंबंधी नियम वेगवेगळे असल्याने बाहेरचे देश आणि देशांतर्गत राज्य अशा दोन्ही बाजूंनी चर्चा होणे अपेक्षित असल्याचे अरिंवद सिंह यांनी सांगितले. देशाबाहेर राहणार्‍या भारतीयांकडून विमानसेवा सुरळीत करण्याची मागणी सातत्याने होत आहेत. ते सध्या वास्तव्यास असलेल्या देशांकडूनही अशी परवानगी मिळणे गरजेची आहे. आम्ही सतत त्यांच्या संपर्कात आहोत.

तसेच, मागील आठवड्यात युरोपीय महासंघाने आंतरराष्ट्रीय प्रवासाचे निर्बंध शिथिल केले आणि काही देशांतून विमानसेवेला परवानगी दिली. पण, परवानगी मिळालेल्या देशांमध्ये भारताचा समावेश नाही. ही यादी दोन आठवड्यांनी पुन्हा एकदा नव्याने तयार होईल, अशी अपेक्षाही सिंह यांनी व्यक्त केली.

काही प्रसारमाध्यमांनुसार, भारतीय विमानतळांवर जास्त प्रमाणात गर्दी दिसून येत असल्याचे काही देशांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी भारतात विमानसेवा सुरू करण्याची अद्याप तयारी दर्शवलेली नाही. त्यामुळे कदाचित ठराविक शहरांतूनच विमानसेवा सुरू करण्याविषयी चाचपणी होत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post