दररोज लवंग खा... हे आजार पळवा…!


माय अहमदनगर वेब टीम
हेल्थ डेस्क - लवंग अशी खाद्य वस्तू आहे ज्यामुळे आरोग्य उत्तम राखण्यास ती मदत करतेच शिवाय आपलं सौंदर्यही खुलवते. लवंगांचा वापर आपण मसाल्यात खूप वेळा केला असेल पण त्याचे अजूनही अनेक फायदे आहेत. ते आज आपण जाणून घेऊया…

लवंगमध्ये प्रोटीन, आयरन, कार्बोहाइड्रेट, कॅल्शियम, फॉस्फोरस, पोटॅशियम, सोडियम आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड युक्त असते. सर्दी-खोकल्यापासून तर अशा अनेक समस्या आहेत ज्यावर लवंगांचा वापर केला जातो.

लवंगच्या तेलाचा एक थेंब जर कपड्यात बांधून ठेवला तर, जेव्हा पण तुमचे नाक बंद होईल किंवा सर्दी झाली तर एकदा वास घेतला तर तुमचे नाक झटक्यात मोकळे होईल.

ज्या लोकांना जळजळ म्हणजे ऍसिडिटी ची समस्या असते, त्यांनी 100 ग्राम पाण्यामध्ये लवंग चा खिस करून चांगले मिसळून प्यावे. यामुळे तुमची ऍसिडिटी लवकर बरि होईल.

बरेच वेळा आपल्या घरातील वयस्कर व्यक्तीच्या जॉइंटमध्ये त्रास असतो. लवंगचे तेल त्या जॉईंटवर लावल्याने बऱ्यापैकी त्रास कमी होईल.

ज्या लोकांना खूप तहान लागते किंवा जास्त घाम येतो,त्यांनी गरम पाण्यात लवंग वाटून पाण्यात मिसळून प्यावी. यामुळे तुमच्या समस्या दूर होतील.

सायनसपासून सुटका मिळवण्यासाठी लवंग अतिशय फायदेशीर ठरते. सायनस असणाऱ्यांनी रोज ३-४ चमचे लवंगाचे तेल पाण्यात घालून घेऊ शकता. त्यामुळे इंफेक्‍शन दूर होईल आणि श्वास घेताना होणार त्रास कमी होईल.

डोके दुखत असल्यास लवंगाचे तेल किंवा लवंगांचा लेप लावावा.

दात दुखत असल्यास किंवा हिरड्यांना सूज आल्यास लवंग तोंडात धरून चघळावी.

दमा, खोकला, आम्लपित्त यांवरही लवंगांचा उपयोग होतो.

सर्दी आणि खोकला यावर लवंगांचा काढा करून त्यात मध घालून द्यावा, कफ मोकळा होतो.

उलटी किंवा मळमळ होत असल्यास लवंग चघळल्यानेदेखील आराम पडतो.

सूज आल्यास त्यावर लवंगीचे तेल चोळून लावल्यानं आराम मिळतो.

अँटिबॅक्टेरिअल म्हणून लवंग काम करते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post