कोरोना विषाणूची परीक्षा पडली महागात, गेला हकनाक बळी



माय अहमदनगर वेब टीम
वॉशिंग्टन - अमेरिकेत एका ३० वर्षीय व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे हा व्यक्ती कोरोना बाधिताने आयोजित केलेल्या 'कोविड पार्टी'ला गेला होता. त्यामुळे त्यालाही कोरोनाची लागण झाली. परंतु, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. स्वत:ला कोरोनाची लागण झाल्यानंतर हा विषाणू पसरतो की नाही, हे पाहण्यासाठी बाधिताने कोविड पार्टी ठेवली होती. या पार्टीला उपस्थिती लावलेल्या ३० वर्षाच्या व्यक्तीलाही कोविड पार्टी चांगलीच भोवली आणि त्याला आपला जीव गमवावा लागला.

या व्यक्तीने मृत्यूपूर्वी नर्ससमोर आपली प्रतिक्रिया मांडली. तो नर्सला म्हणाला- 'मला वाटते मी चूक केली. मी कोरोनाला सहजपणे घेतले. परंतु, तसे नाही.'

कोविडचा संसर्ग खरचं होतो की नाही, हे पाहण्यासाठी बाधित व्यक्तीने ही पार्टी ठेवली होती, असे वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले.

याआधीही अमेरिकेतील अल्बामा येथे अशी घटना घडली होती. येथील काही विद्यार्थ्यांनी कोरोना रुग्णांसोबत पार्टी केली होती. या पार्टीला 'कोविड-१९ पार्टी' असे नाव दिले होते. या पार्टीत सर्वात आधी ज्या व्यक्तीला कोरोनाचे संक्रमण व्हायचे, त्या व्यक्तीला पिझ्झा मिळायचा, असे वृत्त समोर आले होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post