सर्वांत दिलासादायक बातमी! रशियात कोरोनावरील लसीची मानवी चाचणी यशस्वी


माय अहमदनगर वेब टीम
मॉस्को - रशियाच्या मॉस्को राज्य वैद्यकीय विद्यापीठाने कोरोनावरील जगातील पहिल्या लसीचे क्लिनिकल (मानवी चाचणी) ट्रायल यशस्वी झाली असल्याचा दावा केला आहे. सेचेनोव येथील व्हॉलेंटियर्सवर ही चाचणी करण्यात आली. ट्रान्सलेशनल मेडिसीन आणि बायोटेक्नॉलॉजी संस्थेचे संचालक वादिम तारासोव यांनी स्पुटनिकला दिलेल्या मुलाखतीनुसार व्हॉलेंटियर्सच्या पहिला ग्रुपला बुधवारी ( 20 जुलै ) रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे असे सांगितले.

विद्यापीठाने रशियातील गमालेई साथरोग आणि मायक्रोबायॉलॉजी संस्थेने तयार केलेल्या लसीचे 18 जून मानवी चाचाणी करण्यास सुरुवात केली होती. वादिम तारासोव यांनी सांगितले की 'सेचेनोव विद्यापीठाने व्हॉलेंटियर्सवर कोरोना लसीची मानवी चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. ही कोरोनावरील जगातील पहिली लस आहे.'

मेडिकल पॅरासिटोलॉजीचे संचालक अलेक्झांडर लुकशेव यांनी 'सेचेनोव विद्यापीठातील चाचण्याच्या निष्कर्षावरून ही लस मानवी आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित असल्याचे दिसते. त्यामुळे लसीची सुरक्षितता सुनिश्चित होते. बाजारपेठेत सध्या अस्तित्वात असलेल्या विविध लसींच्या सुरक्षिततेशी या लसीची सुरक्षितता सलग्नित आहे.' असे म्हणत ही लस सुरक्षित असल्याचा दावा केला.

ते पुढे म्हणाले की, पुढचा लस विकसीत करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यात विषाणूच्या गुंतागुंतीचा साथरोग परिस्थितीचाही समावेश करण्यात आला आहे. त्यानंतर या लसीते उत्पादान वाढवण्यास सुरुवात करण्यात येईल.

दरम्यान, तारासोव म्हणाले की, 'सेचेनोव विद्यापीठ या महामारीच्या परिस्थिती फक्त शिक्षण देणारी संस्था बनून राहिली नाही तर त्यांनी शास्त्रशुद्ध आणि तांत्रिक संशोधन सेंटर म्हणून काम केले. त्यांनी महत्वपूर्ण आणि गुंतागुंतीच्या औषध उत्पादनातही सहभाग घेतला. आम्ही या लसीवर काम करताना प्रिंसिपल स्टडीजने सुरुवात केली आणि त्यानंतर प्रोटोकॉलनुसार ती विकसीत करण्यात आली आता त्याची क्लिनिकल ट्रायल सुरु आहे.'

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post