बॉलिवुडमध्ये कोरोना उद्रेक सुरुच! आता..
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - देशभरात कोरोना विषाणूचे संक्रमण थांबायचे नाव घेईनासा झाला आहे. यामध्ये बॉलिवूड सेलेब्सनादेखील कोरोनाची लागण झालेली आहे. यामध्ये बच्चन कुटुंबियासह अनेक सेलिब्रिटी आणि त्यांचे कुटुंबीयदेखील कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत.

बच्चन कुटुंबीय

अमिताभ बच्चन यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर अभिषेक बच्चननेदेखील आपली चाचणी करून घेतली. त्याचाही रिपोर्ट पॉझिजिव्ह आला. त्यानंतर ऐश्वर्या राय आणि आराध्या यांचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.टीव्ही सीरियल 'कसौटी जिंदगी' फेम अभिनेता पार्थ समथाननेदेखील आपली कोरोना चाचणी करून घेतली. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे कसौटी जिंदगी मालिकेचे शूटिंग थांबवण्यात आले आहे.'उंगली' फेम अभिनेत्री रेचल व्हाईट कोरोनाच्या विळख्यात सापडली आहे. ट्विटरच्या माध्यमातून तिने याबद्दलची माहिती दिली आहे. ती सध्या होम क्वारंटाईन आहे.बालाजी टेलिफिल्म्सची एक्झिक्युटिव्ह वाईस प्रसिडेंट तनुश्री दासगुप्तादेखील कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. तिने आपल्या हेल्थचे अपडेट दिले आहे. सध्या ती रुग्णालयात उपचार घेत आहे.अनुपम खेर कुटुंबिय

बॉलिवूड अभिनेता अनुपम खेरचे कुटुंबियदेखील कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. अनुपम यांनी स्वत: ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत ही माहिती दिली आहे. त्यांची आई दुलारी खेर आणि भाऊ राजू खेर हे कोरोनाने बाधित आहेत. अनुपम खेर यांची वहिनी आणि पुतणीलादेखील कोरोना पॉझिटिव्ह आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post