चालकरहित इलेक्ट्रिक कार !



माय अहमदनगर वेब टीम
अवघ्या जगाला कोरोनाच्या संकटात ढकलल्यावर चीनने स्वत:ची अर्थव्यवस्था सावरण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. चीनची इलेक्ट्रिक कार निर्मिती कंपनी ‘बाईटन’ एक इलेक्ट्रिक कार आणणार आहे. ही चालकरहित कार असून एकदा पूर्ण चार्च केल्यावर सुमारे 520 किलोमीटर धावू शकते. ‘बाईटन के-बाईट नावाची ही इलेक्ट्रिक कार पुढील वर्षी बाजारात येऊ शकेल.

2018 मध्ये कारचे मॉडेल ऑटोएक्स्पोमध्ये सादर करण्यात आले होते. ही बाईटन के-बाईट इलेक्ट्रिक कार दोन व्हर्जनमध्ये लॉंच केली जाऊ शकते. कारचा बेस व्हेरिएंट ‘75 केडब्ल्यूएच’ आणि टॉप व्हेरिएंट ‘95 केडब्ल्यूएच’ बॅटरी पॅकसह येईल. 75 केडब्ल्यूएच क्षमतेच्या बॅटरी पॅकसह येणारी व्हेरिएंट एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 402 कि.मी. पर्यंतचे अंतर धावू शकेल.

95 केडब्ल्यूएच बॅटरी पॅक व्हेरिएंटची कार सुमारे 520 कि.मी. धावू शकेल. या कारचा लूकही आकर्षक आहे. कारमध्ये एक मोठी डिजिटल इन्फाटेन्मेंट स्क्रीन देण्यात आली आहे. याशिवाय स्टिअरिंग व्हीलवर एक छोटी स्क्रिनही आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post