तीस सेकंदात कोरोना चाचणीमाय अहमदनगर वेब टीम
नॅशनल इन्स्टिटूट ऑफ अॅनिमल बायोटेक्नॉलॉजी (एनआयएबी) ने कारोना विषाणूचे निदान करणारे नवे किट विकसित केले आहे. हे किट अवघ्या तीस सेकंदांमध्येच माणसाच्या लाळेपासून कोरोना विषाणूचा छडा लावते. किटमध्ये बायोसेन्सर असून त्यांच्या वापराने विषारी वस्तू आणि अंमली पदार्थांचाही छडा लावता येऊ शकतो. हे किट पूर्णपणे तयार होऊन लोकांसाठी उपलब्ध होऊ शकेल असा संस्थेचा दावा आहे.

‘एनआयएबी’ मधील तज्ज्ञ डॉ. सोनू गांधी यांनी याबाबतची माहिती दिली. त्यांनी सांगितले की हे उपकरण चाचणीसाठी कुठेही सहजपणे नेता येऊ शकते. चाचणीसाठी अतिशय कमी प्रमाणात लाळेच्या नमुन्याची गरज असते.

या किटच्या सहाय्याने अतिशय कमी किमतीत कोरोनाची चाचणी होऊ शकते. या उपकरणात अवघ्या 1.3 ते 3 व्होल्टच्या बॅटरीचा वापर करण्यात आला आहे. अन्य किटच्या तुलनेत हे उपकरण अधिक संवेधनशील असल्याचे दिसून आले. हे एक पोर्टेबल किट असून ते सहजपणे कुठेही नेता येऊ शकते.

या किटला ‘ई-कोवसेन्स’ असे नाव देण्यात आले आहे. त्यामधील बायोसेन्सर कार्बनन इलेक्ट्रीक आणि कोरोना व्हायरस अँटिबॉडिपासून बनवलेला आहे. हे अँटिबॉडी कोरोना व्हायरसच्या वरच्या स्तरावर स्पाईक प्रोटिनला पकडू शकते.

ज्यावेळी अँटिजन आणि अँटिबॉडी एकमेकांना पकडतात त्यावेळी इलेक्ट्रिक सिग्नल जारी होतो. त्यामुळे विषाणूची पुष्टी होते. सॅम्पलमध्ये विषाणूचे अस्तित्व आहे किंवा नाही हे इलेक्ट्रिक सिग्नलच्या मदतीने तयार झालेल्या रीडिंगला एलसीडी डिस्प्लेवर वाचता येऊ शकते.

हे किट कॉम्प्युटर किंवा मोबाईल फोनशी ब्लूटूथच्या माध्यमातून जोडता येऊ शकते. सॅम्पलमध्ये जितका व्हायरस असेल तितकी सिग्नलची तीव्रता अधिक असेल.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post