लोक कोरोनाने नव्हे तर भीतीने मरत आहेत - बोज्जा


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - सध्या अहमदनगर शहर व उपनगरांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह नव्हे तर कोरोनाच्या भीतीने मयत झाल्याचे निष्पन्न होत आहे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नागरिक भयभीत झाले असून आता नागरिकांमधील भीती दूर करण्यासाठी प्रशासनाने उपाय योजना करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी मेलद्वार जिल्हाधिकारी व आयुक्त यांना केली आहे. कोरोनाविषाणू अहमदनगर शहर उपनगरांमध्ये झपाट्याने वाढत आहे.

प्रशासनाने त्यांच्या परीने उपाययोजना करत आहेत, परंतु सदर उपाययोजना तोकडी पडत असल्याचे दिसून येत असून खाजगीमध्ये अधिकारी व कर्मचारी ही सदरची बाब निदर्शनास आणून देत आहेत. संपूर्ण नगर शहर व उपनगर लॉकडाऊन नसल्यामुळे नागरिक बेजबाबदारपणे वागत असल्याचे दिसून येत आहे कोणीही कोणतेही सोशल डिस्टंसिंगचा वापर करीत नाही अगर प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे वागत नाहीत. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाजीपाला बाजार व इतर बाजारांमध्ये पूर्वीप्रमाणेच गर्दी सुरू झाल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे फेसबुक व्हॉट्सअप द्वारे कोरोनाबाबत चुकीची माहिती पोस्ट करून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करीत आहेत. या भीतीमुळे नगर शहर व उपनगरांमध्ये काही लोक मयत झाल्याचे निष्पन्न झाले आहे, ही बाब अत्यंत गंभीर आहे.

अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण नगर शहर व उपनगर लॉकडाऊन करणे गरजेचे आहे. यापुढे लॉकडाऊन करीत असताना प्रशासनाने जो भाग दुर्गम आहे. हातावर काम करून पोट भरणारे रोजंदारी कष्टकरी जनसमुदाय आहे. अशा भागांमध्ये कम्युनिटी किचनची निर्मिती करावी जेणेकरून नागरिकांचे खाण्यापिण्याचे हाल होणार नाही. तसेच त्या भागामध्य त्यांच्या आरोग्याचा विचार करून प्रथमोपचार व्हॅनचीही व्यवस्था या काळामध्ये करावी अशी मागणी बोज्जा यांनी केली आहे. नुकतेच लोकसेवक सुद्धा सध्याच्या परिस्थितीची जबाबदारी घेत नसून प्रशासनावर ढकलीत आहेत.

ही बाब खेदाची असून प्रशासनाने ही वेळ लोकसेवकांवर का आली याचा गांभीर्याने विचार करून लॉकडाऊन न करता जर कोरोना प्रादुर्भाव कमी होणार असेल तर निश्चितच लॉकडाऊन करू नये. परंतु जर दिवसेंदिवस पेशंटमध्ये अकलनीय वाढ होत असेल तर ही बाब गंभीर आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये अहमदनगर जिल्ह्यात एक हजारापेक्षा जास्त पॉझिटिव्ह पेशंट आढळल्याचे निष्पन्न झाले आहे याचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे, असे निवेदन श्रीनिवास बोज्जा यांनी दिली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post