लडाखमध्ये पुन्हा तणावमाय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - चीनच्या विश्‍वासघातकी धोरणामुळे लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ LAC चीनबरोबर संघर्ष निर्माण झालेल्या ठिकाणी आता सैन्य माघारीची आणि सैनिकांची संख्या कमी करण्याची प्रक्रिया पूर्णपणे थांबली आहे. तिथे पुन्हा तणावाची स्थिती निर्माण झाली असून ही स्थिती दीर्घकाळ राहण्याची शक्यता आहे. India-China standoff त्या दृष्टीने भारतानेही आपली तयारी सुरु केली आहे.

नियंत्रण रेषेजवळ चीनने अधिक सैन्य तैनात केले असून त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने सुद्धा आपले तितकेच सैनिक तैनात केले आहेत. या सैन्य तुकडयांना दीर्घकाळासाठी तिथेच ठेवण्याची भारतीय लष्कराची Indian Army तयारी आहे.

लडाखच्या गलवान खोर्‍यात भारत -चीन सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीनंतर दोन्ही देशांमध्ये तणाव अधिकच वाढला होता. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये वेळोवेळी झालेल्या बैठाकांमध्ये नियंत्रण रेषेवरिल तणाव कमी करण्यावर एकमत झाले होते. त्यानुसार दोन्ही देशांकडून सैन्य माघारी घेण्याची प्रक्रिया सुरु होती. पण चीनच्या विश्‍वासघातकी धोरणामुळे ही प्रक्रिया पूर्णपणे थांबली असून आता पुन्हा तणाव निर्माण झाला आहे.

14 जुलैला क़ॉर्प्स कमांडर्समध्ये चौथ्या फेरीची चर्चा झाली. त्यानंतर सैन्य माघारीची कोणतीही हालचाल झालेली नाही. पूर्व लडाखमध्ये एकूण चार ठिकाणी भारतीय आणि चिनी सैनिक आमने-सामने आले होते. त्यापैकी दोन ठिकाणी सैन्य माघारीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पुढच्या फेरीची चर्चा होईल की, नाही याबद्दल अनिश्चितता आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post