जिल्हा प्रशासनाकडे पाच बोटी उपलब्धमाय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - जिल्ह्यातून गोदावरी, मुळा, प्रवरा, घोड या मोठ्या नद्या असल्याने पूरपरिस्थितीला सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पाच बोटी सज्ज ठेवल्या आहेत. त्याशिवाय जिल्हा परिषद आणि स्थानिक मच्छीमारांकडील बोटींचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती निवारण विभागाचे प्रमुख डॉ. वीरेंद्र बडदे यांनी दिली. 

भंडारदारा, निळवंडे, मुळाधारण या तीन मोठ्या धरणांमुळे मुळा आणि प्रवरा या दोन्ही नद्यांच्या पाण्यावर नियंत्रण येत आहे. हे तिन्ही धरणातील पाणी साठा वाढल्यानंतर या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होते. नाशिक जिल्ह्यातील पावसावर गोदावरी नदीचा पूर अवंलबून राहत आहे. कोपरगाव, नेवासा तालुक्याला नदी काठावरील गावांना पुराचा धोका निर्माण होत असतो. पुणे जिल्ह्यातील पावसावर घोडच्या पाण्याची स्थिती अवलंबून असते. या नद्यांच्या काठावरील गावांच्या सुरक्षितेसाठी जिल्हा प्रशासनाने पाच बोटी सज्ज ठेवल्या आहेत. 


 
श्रीगोंदा तालुक्यातील आर्वी हे गाव घोडनदीच्या काठावर आहे. या ठिकाणी असलेल्या बंधार्‍यामुळे काही प्रमाणात पुराचे पाणी नियंत्रणात येते. एका लाख क्युसेस पेक्षा जास्त पाणी पातळीत वाढ झाल्यानंतर गावाशी संपर्क ठेवण्यात अडचणी येतात. नेवासे तालुक्यातील जैनपूर या गावाला पुराचा जास्त धोका होता. या गावाचे पुनर्वसन करण्यात आलेले आहे. कोपरगाव, राहुरी आणि श्रीगोंदा तालुक्यांसाठी प्रत्येकी एक बोट याप्रमाणे तीन बोटी आहेत. नेवासे तालुक्यासाठी दोन बोटी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post