‘कोरोनानंतर जागतिक अर्थव्यवस्था अधिक संरक्षणवादी’


माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - जगावर ओढावलेल्या कोरोना महारोगराईच्या संकटानंतर जग पूर्वीपासून अधिक संरक्षणवादी अर्थव्यवस्थेकडे वळत आहे. गेल्या काही काळात भारताने जेवढेही मुक्त व्यापार करार (एफटीए) केले त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेला फार विशेष असा फायदा झाला नाही, असा दावा परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी केले. मंगळवारी एका खासगी वृत्तवाहिनीतर्फे आयोजित एका ऑनलाईन् चर्चा सत्रात जयशकंर यांनी त्यांचे विचार मांडले.

एफअीए सारखे करार एकसारखे नसतात. जगासोबत जोडण्यासाठी या सारखे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, असे मत पुढे बोलताना त्यांनी व्यक्त केले. भारत कुठल्याही जागतिक आघाडीत सहभागी होणार नाही, असे स्पष्ट संकेत ही त्यांनी यानिमित्ताने दिले. परराष्ट्र मंत्र्यांच्या वक्तव्यानंतर देश पुन्हा एकदा माजी पंतप्रधान पंडित जवारहलाल नेहरू यांच्या तटस्थवादी धोरणाच्या दिशेने जात आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

देशाच्या स्वातंत्र्यानंतर तत्कालीन पंतप्रधान नेहरुनी दोन धु्व्रीय शक्तींमध्ये समतोल साधण्यासाठी तटस्थतेचे धोरण स्वीकारले होते. हे धोरण एका विशिष्ट युग तसेच विशेष संदर्भात होती. ५० तसेच ६० च्या दशकातील तो काळ होता. तेव्हा देश बराच कमकुवत होता. पंरतु, आता जग समाधानाच्या दृष्टिने भारताकडे ब​घत आहे. कनेक्टिव्हिटी, सागरी सुरक्षा, दशतवाद, हवामान बदलासारखे मोठे मुद्दे आहेत. यात भारताचे योगदान जगमान्य आहे. आता देश तटस्थतेचा दर्शक बनू शकत नाही, असेही त्यांनी पुढे बोलतांना स्पष्ट केले.

एफटीएमुळे देशाच्या क्षमता बांधणीत अर्थव्यवस्थेला फायदा झाला नाही. जगासोबत जोडल्या जाण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पंरतु, ते एफटीए केंद्रितच असावे हे आवश्यक नाही, असेही जयशंकर म्हणाले.

सर्व एफटीए एक सारखे नाहीत. देशाची अर्थव्यवस्था तसेच उत्पादन क्षमतेच्या स्थितीकडे बघून एफटीएमुळे बराच फायदा झाल्याचे म्हणता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post