राजीव गांधी फाउंडेशन, इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टच्या चाैकशीचे आदेश




माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली-  केंद्रीय गृह मंत्रालयाने कॉंग्रेसच्या अडचणी वाढवल्या आहेत. गृह मंत्रालयाने कॉंग्रेस आणि गांधी परिवाराच्या राजीव गांधी फाउंडेशन, राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट आणि इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट या तिघांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. पीएमएलए, (prevention of money laundering act), आयकर कायदा (Income tax) आणि एफसीआरएच्या (foreign contribution amendment rule) कायद्याच्या तरतुदींच्या उल्लंघनाची चौकशी केली जाणार आहे. यासाठी एक आंतर-मंत्री समिती तयार करण्यात आली आहे. या निर्णयामुळे कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांची अडचण वाढू शकतात.

आता का चर्चा

चीन संदर्भात पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या वक्तवावर काँग्रेसने अनेक प्रश्न उपस्थित केला हाेते. त्यानंतर भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांनी राजीव गांधी फाउंडेशनचे चीन साेबत लिंक असल्याचा आराेप केला हाेता. नड्डा यांनी २००५-०६ मध्ये राजीव गांधी फाउंडेशनला चीनकडून ३ लाख डॉलर (जवळपास ९० लाख रुपये) मिळाले असल्याचे सांगितले हाेते. त्यानंतर चीनसाेबत मुक्त व्यापार सुरु झाला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post