ही तर म्हणजे ‘मॅच फिक्सिंग’माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सध्या दैनिक सामनात मुलाखत सुरू आहे. त्यावर फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. डब्ल्यूडब्ल्यूएफची कुस्ती तुम्हाला माहिती आहे का? पूर्वी तशीच नुरा कुस्ती व्हायची. त्याला मॅच फिक्सिंग असे म्हटले जायचे. आता तिच फिक्सिंग सुरू आहे. त्यांची मॅच फिक्सिंग संपू द्या. योग्यवेळी त्यावर मी प्रतिक्रिया देईलच, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

विरोधक सरकार पाडणार असल्याच्या शिवसेनेच्या दाव्यात काहीच तथ्य नसल्याचेही ते म्हणाले. स्वत:च स्वत:ला मारून घ्यायचे आणि रडल्याचे नाटक करायचे, अशी सध्या नवी पद्धत आली आहे. आपले अपयश झाकण्यासाठीच ही पद्धत अवलंबली जाते. सध्या शिवसेना या पद्धतीचा वापर करत आहे. कोणीही सरकार पाडणार नसताना स्वत:च कांगावा करायचा आणि मुलाखतीही देण्याचे प्रकार सुरू आहेत. करोनावरून लक्ष विचलीत करण्यासाठीच हा प्रकार सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.

तसेच फडणवीस यांच्या दौर्‍यांवरून पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेला फडणवीस यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिले आहे. मंत्री बनवल्याने शहाणपणा येत नसतो. नया है वह; अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे. फडणवीस यांनी पहिल्यांदाच आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांवर जोरदार टीका केली होती. सध्या आमचा जोर फिट राहण्यावर आहे. राज्याला करोनामुक्त करण्यावर आहे. मात्र, विरोधी पक्षनेते हेल्थ आणि डिझास्टर टुरिझजममध्ये व्यस्त आहेत, अशी बोचरी टीका आदित्य यांनी केली होती. त्यावर फडणवीस यांनी हा टोला लगावला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post