त्यामुळे कार खरेदी केल्यानंतर ६ महिन्यापर्यंत ग्राहकांकडून कंपनी ईएमआय घेणार नाही




माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच उद्योगधंदे ठप्प पडले होते. पण आता बर्‍याच देशातील लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आल्यानंतर पुन्हा एकदा अर्थचक्र सुरु झाले आहे. त्यातच लॉकडाऊनच्या काळात बहुतांश कार निर्मिती करणार्‍या गाड्यांची विक्री न झाल्यामुळे आता ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी विविध आयडियांचा वापर करत आहेत. याच दरम्यान आता देशातील दिग्गज ऑॅटोमोबाईल कंपनी टाटा मोटर्सने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक नवी धमाकेदार ऑॅफर आणली आहे. त्या ऑॅफर अंतर्गत ग्राहकांना विना डाऊन पेमेंट शिवाय टाटा कंपनीची नवी कार खरेदी करता येणार आहे. करुर वैश्य बँके सोबतच्या भागिदारीसह टाटा मोटर्सने ही ऑॅफर लॉन्च केली आहे.

टाटाच्या या ऑॅफर अंतर्गत टियागो, नेक्सॉन आणि अल्ट्रॉज कार डाऊन पेमेंट शिवाय खरेदी करता येणार आहे. कार खरेदी केल्यानंतर ६ महिन्यापर्यंत ग्राहकांकडून कंपनी ईएमआय घेणार नाही. तसेच १०० टक्के ऑॅन-रोड फंडिंग सुविधा सुद्धा देत आहे. त्यानुसार ती ५ वर्षांसाठी मिळणार आहे.

नवी फायनान्स स्किम्स व्यतिरिक्त टाटा मोटर्स ८ वर्षांपर्यंत अशा लॉन्ग टर्मसाठी लोनवर सोप्पी सेट-अप- ईएमआय ऑॅफर करत आहे. तसेच कमी ईएमआयची सुविधा कंपनीकडून ग्राहकांना देण्यात येणार आहे. त्यानुसार टाटा टियागोवर प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला ईएमआय हा ४,९९९ रुपये असणार आहे. तसेच अल्ट्रॉजसाठी ५,५५५ रुपयांचा ईएमआय आणि नेक्सॉनवर ७,४९९ रुपयाचा ईएमआय देऊन खरेदी करता येणार आहे.

काही दिवसांपूर्वी कंपनीने त्यांच्या अल्ट्रॉज हॅचबॅक कारवर ग्राहकांना शानदार ऑॅफर दिली आहे. कंपनीने नव्या ईएमआय स्किम अंतर्गत ग्राहकांना ही कार फक्त ५,५५५ रुपये मासिक हप्त्यावर रुपये घरी आणता येणार आहे. ही प्रिमियम हॅचबॅक कार वर्षाच्या सुरुवातीला लॉन्च करण्यात आली होती. टाटा कंपनीची ही कार मारुति बलेनो, ह्युंदाई एलाईट ग्२०, होंडा जॅझसारख्या कारला टक्कर देण्यासाठी उतवरण्यात आली असून या कारला ग्लोबल क्रॅश टेस्टमध्ये ५ स्टार देण्यात आले आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post