जुन्या वादातून एकास दांडक्याने बेदम मारहाण


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – मागील भांडणाचा मनात राग धरून तिघांनी लाकडी दांडके, धारदार वस्तुने व लाथाबुक्यांनी एकास बेदम मारहाण केली. ही घटना सर्जेपुरा परिसरातील रामवाडी येथील सार्वजनिक शौचालयासमोर शुक्रवारी (दि.3) सकाळी 8.30 वा. घडली.

याबाबतची माहिती अशी की, रामवाडी येथील वैरागर व साबळे यांच्यात गुरूवारी (दि.2) किरकोळ कारणावरून भांडणे झाली होती. या भांडणाचा मनात राग धरून किरण अनिल साबळे (वय 25), लखन अनिल साबळे, दीपक अनिल साबळे (सर्व रा. रामवाडी) यांनी चहा टपरी चालक अक्षय दिलीप वैरागर (वय 23, रा. रामवाडी) याला शिवीगाळ, दमदाटी करीत लाकडी दांडक्याने, कोणत्यातरी धारदार शस्त्राने व लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. यात अक्षय हा गंभीर जखमी झाला असुन त्याच्यावर औषधोपचार चालु आहे.

याप्रकरणी अक्षय वैरागर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी भारतीय दंड विधान कायदा कलम 324, 323, 504, 506, 34 प्रमाणे मारहाणीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. अधिक तपास पोलिस नाईक मरकड हे करीत आहेत

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post