राहुल गांधी म्हणाले, जेव्ह अपयशावर अभ्यास केला जाईल तेव्हा यामाय अहमदनगर वेब टीम
दिल्ली - भारतात करोनाची परिस्थिती अटाेक्यात येत नसल्याने कांॅग्रेस नेते राहुल गांधी यांनी माेदी सरकावर हल्ला चढवला. राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. भविष्यात हॉवर्डमध्ये जेव्हा अपयशावर अभ्यास केला जाईल तेव्हा या तीन गोष्टींचा उल्लेख असेल असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे.


राहुल गांधी यांनी ट्विटरला नरेंद्र मोदींचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात कराेनासंदर्भात माेदींचे भाषण आहे. यावेळी राहुल गांधी यांनी कोविड, नोटबंदी आणि जीएसटीचा उल्लेख केला आहे. राहुल गांधी यांनी म्हटलं आहे की, हॉवर्डच्या बिजनेस स्कूलमध्ये भविष्यात अपयशाच्या केस स्टडी म्हणून हे शिकवले जाईल.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post