या गोष्टी करा आणि टाळा मोबाईलचा ब्लास्ट



माय अहमदनगर वेब टीम
मोबाईलमध्ये स्फोट झाल्याच्या बातम्या आपण वारंवार ऐकत असतो. मोबाईलमध्ये का स्फोट होतो आणि हे टाळण्यासाठी काय करावे, हे आपण आता पाहू… काही वेळा आपण आपला मोबाईल सतत इतका वापरतो की, तो गरम होऊन जातो. जर तुमचा फोन गरम झाला आहे असे तुम्हाला वाटले, तर त्याचा वापर तत्काळ बंद करा आणि त्याला नॉर्मल टेम्परेचरवर येऊ द्या.

अनेक लोक रात्री झोपाताना मोबाईल चार्जिंगला लावतात आणि सकाळी काढतात. परंतु, असे करणे धोकादायक ठरू शकते. तुमचा फोन ओव्हर चार्ज होऊन स्फोट होण्याची शक्यता असते. म्हणून फोन 100 टक्के चार्जिंग न करता 98 टक्क्यांपर्यंतच चार्जिंग करावा. बॅटरी संपत आली असताना अनेकजण फोन चार्जिंगवर लावून त्याचा वापर करीत असतात. चार्जिंगची वेळ ही फोनची विश्रांतीची वेळ असते, त्यावेळी गेम खेळून किंवा इतर काही कामे करून त्याच्यावर अत्याचार केल्यासारखेच आहे. यामुळे फोनमधील प्रोसेसर आणि बॅटरी दोन्ही गरम होते.


चार्जिंग सुरू असताना कॉल करणे महागडे ठरू शकते. जर फोनची बॅटरी 15 टक्क्यांच्या खाली असेल आणि काही महत्त्वाचे काम नसेल तर शक्यतो फोन स्विचऑफ करूनच चार्जिगला लावावा. ते शक्य नसेल तर किमान इंटरनेट डाटा तरी बंद करावा. जेथे फोन चार्जिंग होत आहे, तेथे मोकळी हवा असल्यास उत्तम. नसेल तर किमान एसी, फॅॅन, कुलरचे थंड वारे फोनपर्यंत पोहोचेल याची दक्षता घ्या. कारमध्ये नियमित फोन चार्जिंग करणे टाळा, ही एक आपत्कालीन सोय आहे. फोन चार्जिंग करताना डॅशबोर्डवर ठेवू नका; कारण उन्हामुळे आणि चॉर्जिंगमुळे फोन दोन्ही बाजूंनी तापू शकतो.

फोनची बॅटरी खराब झाली असल्यास ओरिजनल बॅटरीच विकत घ्या. स्वस्त मिळणार्‍या डुप्लिकेट बॅटरीमुळे फोन ब्लास्ट होण्याचा धोका वाढतो. तीच गोष्ट चार्जरबाबत आहे. डुप्लिकेट चार्जर न वापरता ओरिजनलचाच वापर करा. मोबाईलमधील काही अॅप्सचा वापर केल्यामुळे स्मार्टफोन खूप गरम होतो. जीपीएस नेव्हिगेशनवाले अॅप वापरताना याचा परिणाम जाणवतो. त्यामुळे जीपीएसवाले अॅप्सचा उपयोग कमीत कमी वेळ करा.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post