सुरक्षारक्षक कोरोनाग्रस्त झाल्याने अभिनेत्री रेखा यांचा बंगला सील!


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - करण जोहर, बोनी कपूर आणि आमिर खानच्या स्टाफमधील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर आता जुन्या काळातील सदाबहार अभिनेत्री रेखाचा सिक्युरिटी गार्ड कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर, बीएमसीने रेखाच्या बंगल्यावर नोटीस नोटीस चिकटवून तो परिसर कोरोना कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केला आहे. रेखाचा बंगला मुंबईच्या वांद्रे येथील बॅंडस्टँड भागात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रेखाच्या घराबाहेर नेहमीच २ सुरक्षारक्षक असतात. त्यातील एकजण काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्याच्यावर मुंबईतील बीकेसी परिसरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यानंतर, बीएमसीने तो संपूर्ण परिसर सॅनिटाईज केला आहे. मात्र रेखा किंवा त्यांच्या प्रवक्त्यांकडून याबाबत अधिकृतपणे माहिती देण्यात आलेली नाही.
0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post