१४० अंकाने सुरू होणार्‍या फोन कॉलच्या अफवाच



माय अहमदनगर वेब टीम
मुंबई -140 या अंकाने सुरुवात होणार्‍या अनोळखी क्रमांकावरून आलेला फोन कॉल रिसीव्ह केला तर आपल्या खात्यातील सर्व पैसे काढले जाऊन अकाउंट शून्य होते असे जे संदेश समाजमाध्यमावर फिरत आहेत, त्या संदेशामध्ये कोणतेही तथ्य नाही, अशी माहिती महाराष्ट्र सायबर सेलने दिली आहे.

जोपर्यंत आपण बँक अकाउंट डिटेल्स, ओटीपी अथवा  क्रेडिट कार्ड,  डेबिट कार्डचे पूर्ण नंबर तसेच  सी. व्ही. व्ही. , पिन नंबर शेअर करीत नाही तोपर्यंत आपल्या बँक खात्याला कसलेही नुकसान होऊ शकत नाही. जर आपणास 140 ने सुरुवात होणार्‍या क्रमांकावरून फोन कॉल आला तर घाबरू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.  हे क्रमांक टेलिमार्केटिंगकरिता दिले गेलेले असतात. परंतु हेदेखील लक्षात ठेवावे की, अशा किंवा इतर कोणत्याही क्रमांकावरून फोन कॉल आल्यास व ओटीपीसह आपली वैयक्तिक माहिती, बँक डिटेल्स, डेबिट, क्रेडिट कार्ड डिटेल्स जर कोणी विचारत असेल तर आपण आपली कोणतीही वैयक्तिक माहिती, बँक खात्याची माहिती देऊ नये,  असे सांगण्यात आले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post