आता या औषधासाठी लागणार आधारकार्ड



माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - कोरोनाच्या उपचारांसाठी तयार करण्यात आलेल्या रेमडेसिवीर औषधाचा काळाबाजार हाेत आहे. यामुळे या औषधासाठी आधारकार्ड सक्तीचे करण्याच्या सूचना मंत्री अस्लम शेख यांनी अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तांना केल्या आहेत.

रेमडेसिवीर औषधाचा फार मोठ्या प्रमाणावर काळाबाजार होत असल्याच्या बातम्या येत आहे. या पार्श्वभूमीवर अस्लम शेख म्हणाले की, यापुढे रेमडिसिवीर औषधासाठी रुग्णांना आधारकार्ड दाखविणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. ज्या रुग्णांना रेमडेसिवीर औषधाचा डोस देण्यात आला आहे. त्या रुग्णांची नोंद त्यांच्या आधारकार्डसह ठेवणंही रुग्णालयांना बंधनकारक असेल. असे न करणाऱ्यांवर त्वरित फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल.

रेमडेसिवीर इंजेक्शनचा देशभरात याचा तुटवडा असल्याने ज्यादा दराने विक्री होत असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर हे आदेश देण्यात आले होते. या इंजेक्शनच्या आयातीसाठी काही कंपन्यांना परवानगी दिली होती. तसेच भारतातील तीन कंपन्यांना निर्मितीची परवानगीही दिलेली आहे. मात्र तरीही देशभरात अनेक ठिकाणी ज्यादा दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी येत होत्या.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post