आ.रोहित पवारांनी अहमदनगर जिल्हा रुग्णालयास दिले चष्मे व मास्क


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असुन यावर आळा घालण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते तथा कर्जत जामखेडचे आ. रोहित पवार हे पुन्हा एकदा जिल्ह्याच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. बारामती अॅग्रोच्या माध्यमातुन पुन्हा एकदा 1000 चष्मे, 150 एन- 95 मास्क व 2000 कापडी मास्क हे नगर मेडिकल असोसिएशन व राष्ट्रवादी डॉक्टर असोसिएशन यांच्या हस्ते प्रशासनाला देण्यात आले.

जिल्हा शासकीय रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांच्याकडे हे साहित्य सुपूर्द करण्यात आले. यावेळी आ. संग्राम जगताप, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, नोडल अधिकारी डॉ.बापूसाहेब गाडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रा.माणिकराव विधाते, विरोधी पक्ष नेते संपत बारस्कर, अजिंक्य बोरकर, प्रकाश भागानगरे, दिलदार सिंग बीर, बाबासाहेब गाडळकर, अभिजित खोसे, अमित खामकर, डॉ. अनभुले, डॉ.रणजीत सत्रे उपस्थित होते.


कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आणि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले. राज्यात गरजेनुसार लॉकडाऊनचा कालावधी जसा-जसा वाढला तसा-तसा वेळेनुसार टप्प्याटप्प्याने आपल्या मतदारसंघाला मदतीचा हात देणार्‍या आ. रोहित पवारांच्या दातृत्वाचे अनेक पैलू राज्याने पाहिले आहेत. या काळात गरजू, शेतमजुर, भुमीहीन तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू देऊन त्यांची काही दिवसांची भुक भागवली. आपली सामाजिक बांधिलकी जपत कर्जत-जामखेड मतदारसंघातच नव्हे तर राज्याच्या आरोग्य विभागालाही बळकटी देण्याचे काम आ.रोहित पवार यांनी केले आहे. संपुर्ण राज्यात कोरोना योद्ध्यांना कोरोनासोबत लढण्यासाठी सॅनीटायझरचे वाटप करण्यात आले. मतदारसंघातील कोरोना योद्ध्यांना कोरोनापासुन बचाव करण्यासाठी व नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी मास्क, चष्मे, हँडग्लोज देऊन मतदारसंघातील सर्वच गावांमध्ये निर्जंतुकीकरण औषधाची 2 ते 3 वेळा फवारणी देखील करण्यात आली. जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता. प्रादुर्भाव कमी करण्यासाठी. शासकिय नियमांची अंमलबजावणी होणे देखील तेवढेच महत्वाचे असुन याचे पालन सर्व घटकांनी करणे गरजेचे असल्याचे मत आ. रोहित पवार यांनी व्यक्त केले.

यावेळी आ.पवार यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडून जिल्ह्याच्या कोरोना प्रादुर्भावाची माहिती घेतली. यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा किती सक्षम आहे. याची माहिती दिली. तसेच जिल्हा रुग्णालयात उभारण्यात येत असलेल्या अद्ययावत आय. सी.यु. आणि डायलीसीस विभागाची पाहणीही त्यांनी केली.

जिल्ह्यासाठी रॅम डेसिवीर औषध उपलब्ध

कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी रॅमडेसिवीर हे अन्टीव्हायरल औषध जिल्हा रुग्णालयात उपलब्ध झाले आहे. राज्य शासनाने नगरसाठी 18 इंजेक्शन्स उपलब्ध करून दिले असून, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी हे औषध जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांच्याकडे सुपूर्द केले. सदरचे औषध प्रकृती चिंताजनक असलेल्या कोरोनाबाधितांसाठी दिले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post