जगभरात ७.२३ कोटी संगणक विक्री
माय अहमदनगर वेब टीम
लंडन - गेल्या काही महिन्यांमध्ये जागतिक पातळीवर घरगुती संगणकाच्या (पीसी) मागणीत वाढ नोंदवली गेली आहे. इंटरनॅशनल डाटा कॉर्पोरेशनच्या (आयडीसी) अहवालानुसार 2020 या आर्थिक वर्षातील दुसर्‍या तिमाहीत जागतिक पातळीवर संगणक विक्रीत 11.2 टक्के वाढ झाली आहे. कोरोना महामारीमुळे अनेक लोक ‘वर्क फ्रॉम होम’ला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे लॅपटॉप आणि पीसीच्या मागणीत वाढ झाल्याचे दिसत आहे, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

सर्वाधिक मागणी युरोप, आफ्रिका, अमेरिकेत

आयडीसीच्या माहितीनुसार या तिमाही काळात 72.3 मिलियन (7 कोटी 23 लाख) संगणकांची विक्री झाली आहे. यात लॅपटॉप, वर्कस्टेशन आणि डेस्कटॉपचा समावेश आहे. विशेष म्हणजे युरोप, मध्यपूर्व आशिया, आफ्रिका आणि अमेरिकेत सर्वाधिक विक्रीवाढ नोंदली गेली आहे. भारतात तिसर्‍या तिमाहीत ही विक्रीत वाढ दिसू शकेल, असे म्हटले जात आहे.

40 हजार पेक्षा कमी किमतीच्या पीसींना भारतीयांची पसंती

मोबाईलच्या तुलनेत भारतात वैयक्‍तिक संगणकांना इतर देशांच्या तुलनेत असलेली मागणी कमी आहे. भारतातील खरेदीदार 40 हजार रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या संगणकांवर लक्ष्य केंद्रित करीत आहेत. नवे ब्रँड आणि नव्या टेक्नॉलॉजीनंतर संगणकांच्या किमती स्वस्त होण्याची आशा आहे.
एकूण संगणक विक्रीत या पाच कंपन्यांचा वाटा 80 टक्के इतका आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post