या बड्या मंत्र्याची पत्नीही सुनीताताई करोनाबाधित
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या पत्नी आणि नेवासा पंचायत समितीच्या माजी सभापती सुनीताताई गडाख यांना करोना संक्रमण झाले आहे. यानंतर मंत्री गडाख यांनी स्वत:ला 14 दिवसांसाठी होम क्वारंटाईन करून घेतले आहे. दरम्यान, आज ना.गडाख यांचा स्त्राव नमुना तपासणीसाठी घेण्यात आला आहे. त्यांचा करोना चाचणी अहवाल शनिवारी सायंकाळपर्यंत हाती येण्याची शक्यता आहे.

17 जुलै रोजी सुनीता यांची कोविड covid-19 टेस्ट पॉझिटिव्ह आली असून आज शनिवारी, 18 जुलैला माझा स्वब दिलेला आहे. त्यामुळे मी स्वतः होम कोरंटाइन होण्याचा निर्णय घेतला आहे. आपणही आपल्यासह कुटूंबियांची काळजी घ्या. असे ना.गडाख यांनी याबाबतची माहिती देताना ट्विटमध्ये म्हटले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post