अतिक्रमणात गाडी लावण्यावरून फळ विक्रेत्यास मारहाणमाय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – फळ विक्रेत्यास अतिक्रमणात गाडी लावु नको, असे म्हणुन कोयत्याने व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली व ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना मंगळवारी (दि.30) सकाळी 10.30 च्या सुमारास सिटी केअर हॉस्पिटलसमोर घडली. याबाबतची फिर्याद बुधवारी (दि.1) सायंकाळी 5 च्या सुमारास तोफखाना पोलिस ठाण्यात देण्यात आली.

याबाबतची माहिती अशी की, इस्माईल मुराद पठाण (वय-28, मरियम मस्जिद जवळ, मुकुंदनगर) या फळ विक्रेत्याने आपली फळ विक्रीची गाडी सिटीकेअर हॉस्पिटलसमोर रस्त्याच्या कडेला लावली असता तेथे अक्रम असलम शेख (रा. मुकुंदनगर) याने तु येथे हातगाडी लावु नकोस, असे सांगितले. यावर इस्माईल पठाण याने समजावण्याचा प्रयत्न केला असता अक्रम शेखने नारळ कापण्याचा कोयता इस्माईलच्या गळ्याजवळ मारण्याचा प्रयत्न केला. इस्माईलने तो वार चुकवला मात्र यावेळी त्याच्या हाताला जबर जखमी झाली. तसेच अक्रम शेख याचा जोडीदार कद्दुस असलम शेख (रा. आनंदीबाजार, नगर) याने हातातील लाकडी दांडक्याने इस्माईल याच्या कपाळावर, छातीवर, पोटावर, पाठीवर मारहाण केली व पुन्हा येथे गाडी लावली तर तुला ठार मारू असे धमकावले.

याप्रकरणी ईस्माईल पठाण याने दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी भारतीय दंड विधान कायदा कलम 324, 323, 504, 506 प्रमाणे मारहाणीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. अधिक तपास पोलिस नाईक अभंग हे करीत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post