कोरोनाबधिताचा मृत्यू ; अंत्यविधीबाबत प्रशासन गाफीलमाय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - कोरोना अहवाल पाॅझिटीव्ह आलेल्या श्रीरामपूर शहरातील कुरेशी मोहल्ल्यातील ६० वर्षीय रुग्णाचा रात्री नगर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. आज त्याचा शासकिय नियमानुसार दफनिवधी करण्यात आला.
दरम्यान, तालुक्यातील महांकाळवाडगाव येथील कोरोनाबाधित महिला रुग्णाचा (वय ७६) चार दिवसापूर्वी मृत्यू झाला असून त्याची प्रशासनालाही माहिती नसल्याचे समोर आले आहे.
मंगळवारी या रुग्णाच्या घशातील स्राव तपासणीसाठी पाठविले होते. काल रात्री उशिरा त्याचा कोरोना अहवाल पाॅझिटीव्ह आला होता. नगर येथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर नातेवाईकांकडे मृतदेह देण्यात आला. मात्र याबाबत येथील प्रशासनाला कुठलीही माहिती नव्हती. नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांना माहिती मिळताच तहसीलदार प्रशांत पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर पाटील यांनी पोलीस निरिक्षक श्रीहरी बहिरट व तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. मोहन शिंदे यांना कळविले. डाॅ. शिंदे यांनी पुढील कार्यवाही केली.
जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांच्याशी संपर्क साधला असता, कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह सॅनिटाईज करून दुहेरी प्लॅस्टिकमध्ये बंदिस्त केला जातो. नातेवाईकांनी मागणी केल्यास त्यांच्या ताब्यात मृतदेह दिला जातो. मात्र त्यांनी तो नगरपालिकेच्या ताब्यात देणे क्रमप्राप्त आहे. त्यानंतर पालिकेने नातावाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post