दहावीचा निकाल ९९ तर बारावीचा ९६ टक्के




माय अहमदनगर वेब टीम
मुंबई -आयसीएसई बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. त्यानुसार दहावीचा निकाल ९९.३३ टक्के तर बारावीचा निकाल ९६.८४ टक्के लागला आहे. देशात आयसीएसई बोर्डाचे दहावीचे एकूण २ लाख ६ हजार ५२५ तर बारावीचे एकूण ८५,६११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. महाराष्ट्रात दहावीचे २३,३१९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तर बारावीचे ३,१०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. करोना स्थितीमुळे दहावी आणि बारावी दोन्ही निकालांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली नाही. निकालाचे गुणपत्रक ४८ तासानंतर डिजिलाॅकरवर मिळणार आहे. विद्यार्थ्यांना तात्काळ पुनर्मुल्यांकनासाठी अर्ज करता येणार आहे. प्रत्येक पेपरच्या पुनर्मुल्यांकनासाठी विद्यार्थ्यांकडून १ हजार रूपये आकारले जाणार आहे.

बेबसाईटवर असा पाहा निकाल

www.cisce.org या संकेतस्थळावर जा.-आवश्यकतेनुसार ICSE किंवा ISC ची निवड करा. यूआयडी, इंडेक्स नंबर आणि कॅप्चा निट भरा.त्यानंतर Show Result वर क्लिक केल्यावर निकाल दिसेल.

एसएमएसच्या माध्यमातून निकाल

संकेतस्थळाशिवाय विद्यार्थी एसएमएसच्या माध्यमातून देखील निकाल पाहू शकतात. त्यासाठी विद्यार्थ्यांना आईसीएसई (रोल नंबर) टाइप करून 09248082883 एसएमएस करावा लागेल.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post