पोलिसांची हत्या करणाऱ्या गँगस्टर विकास दुबेचा एन्काऊंटर


माय अहमदनगर वेब टीम
कानपूर - कुख्यात गुंड  विकास दुबेला उज्जैनमधुन कानपुरला घेऊन जाताना पोलिसांच्या वाहनाचा अपघात झाला आहे. दुबे  किरकोळ जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान दुबे घटनास्थळावरून पळून जात असताना त्याच्यावर गोळीबार केल्याचे ही वृत्त ही समोर येत आहे. या गोळीबारात दुबे जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल केल्याचेही  सांगण्यात येत आहे. पोलिस आणि दुबे यांच्या चकमकीत विकास दुबे याला ठार केले असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अपघात झाल्यानंतर पळून जाण्याचा प्रयत्न दुबेने केला होता

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post