अमेरिकेतील दिग्गजांचे ट्विटर अकाऊंट हॅक
माय अहमदनगर वेब टीम
वॉशिंग्टन - अमेरिकेतील अनेक दिग्गजांचे ट्विटर अकाऊंट्स हॅक झाल्याने खळबळ उडाली आहे. ट्विटर हॅक केल्यानंतर एक मेसेज पोस्ट करण्यात आला होता. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे तसेच जो बिडेन, टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अॅलोन मस्क, मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स आणि अॅपलच्या महत्त्वाच्या खात्यांचेही अकाऊंट हॅक करण्यात आले आहे.

या घटनेनंतर ट्विटरच्या सुरक्षेच्या दाव्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, यानंतर काही वेळानं ट्विटरनं एक ट्विट करत या प्रकरणाचा तपास करत असल्याची माहितीही दिली.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post