तरच आयपीएलचे आयोजन होण्याची चिन्हे


माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली -  आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) आगामी बैठकीत यंदा ऑॅस्ट्रेलियामध्ये प्रस्तावित असलेल्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र, या बैठकीची तारीख अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, ही बैठक पुढील आठवड्यात होण्याची चिन्हे आहेत.

कोरोनामुळे आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित झाले आहे. तर, कोरोनाची स्थिती पाहून विश्वकरंडक स्पर्धेच्या आयोजनाबाबतचा विचार केला जाईल, असा निर्णय आयसीसीच्या यापूर्वीच्या बैठकीत घेण्यात आला होता. ऑॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑॅस्ट्रेलियामध्ये होणार्‍या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेचे भवितव्य अद्यापही अंधारातच आहे. १० जूनला आयसीसीच्या बैठकीत टी-२० विश्वकरंडक आयोजनाबद्दल चर्चा झाली, पण यावर कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. आयसीसीने या स्पर्धेच्या आयोजनाबद्दलचा निर्णय जुलै महिन्यापर्यंत पुढे ढकलला होता.

जर विश्वकरंडक स्पर्धा रद्द झाली तर, आयपीएलचे आयोजन होण्याची चिन्हे आहेत. ’’आम्हाला आयपीएलचे आयोजन करायचे आहे. कारण जीवनाला आणि क्रिकेटला सामान्य पातळीवर आणणे गरजेचे आहे. परंतु टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसंदर्भात आम्हाला आयसीसीकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. आम्ही माध्यमांद्वारे बर्‍याच गोष्टी ऐकत राहतो, परंतु अद्याप तसे अधिकृतपणे मंडळाच्या सदस्यांना कळवले गेले नाही’’, असे गांगुलीने एका वृत्तवाहिनीला सांगितले होते.

तर, येत्या सप्टेंबरमध्ये यूएईत आयोजित करण्यात आलेला ’आशिया कप’ रद्द करण्यात आल्याचे गांगुलीने सांगितले होते. आशिया कप रद्द करण्यामागे काय कारण आहे, याबाबत मात्र गांगुलीने कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post