टॉम मूडी यांनी आपली वर्ल्ड टी-२० इलेव्हनची निवड केली : मोठा खेळाडू संघाबाहेर


माय अहमदनगर वेब टीम
कोलकाता - ऑॅस्ट्रेलियाचे माजी अष्टपैलू खेळाडू आणि सध्या आयपीएल संघ सनरायझर्स हैदराबादचे प्रशिक्षक टॉम मूडी यांनी आपली वर्ल्ड टी-२० इलेव्हनची निवड केली आहे. त्यांनी या संघाचे कर्णधारपद भारताचा हिटमॅन रोहित शर्माला दिले आहे. मूडी यांनी भारताचा विश्वविजेता कर्णधार महेंद्रसिंह धोनीला संघाबाहेर ठेवले असून त्याच्या जागी विंडीजच्या निकोलस पूरनला संघात यष्टीरक्षकाची भूमिका दिली आहे.

समालोचक हर्षा भोगले यांच्यासोबतच्या मुलाखतीत मूडी म्हणाले, ‘मी पुढील तीन आठवड्यांत खेळणार्‍या संघाची निवड करत आहे. मला जोस बटलरला आणायचे होते. पण मला डावखुरा फलंदाज संघात जास्त आवडेल. म्हणून मी निकोलस पूरनला ही संधी देईन.‘

धोनीबद्दल मूडी म्हणाले, ’’या संघात धोनीची निवड झाली नाही. कारण माझे लक्ष आजच्या संघाची निवड करण्यावर आहे. मीही धोनीचा मोठा चाहता आहे. कर्णधार आणि खेळाडू म्हणून त्याने जे साध्य केले ते अविश्वसनीय आहे.‘

टॉम मूडी यांचा वर्ल्ड टी-२० इलेव्हन संघ -

रोहित शर्मा (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, विराट कोहली, अब्राहम डिव्हिलियर्स, निकोलस पूरन, आंद्रे रसेल, सुनील नरेन, मिचेल स्टार्क, राशिद खान, जसप्रीत बुमराह, जोफ्रा आर्चर. रवींद्र जडेजा (१२ वा खेळाडू).

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post