आघाडीतील धुसफूस संपेना!


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - महाविकास आघाडीतील नाराजीची घोडदौड काही केल्या थांबताना दिसत नाही. काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे पुन्हा एकदा नाराज झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विभाजनाचा प्रस्ताव आपल्याला न विचारता मंजुरीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत मांडल्याने, अशोक चव्हाण नाराज आहेत. अशोक चव्हाण यांनी कडक शब्दात मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली. अधिकारी परस्पर प्रस्ताव देत असल्याने अशोक चव्हाण नाराज आहेत.

राज्य मंत्रिमंडळाची गुरुवारी बैठक झाली. या बैठकीत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विभाजनाचा प्रस्ताव मांडण्यात आला. मात्र तो अशोक चव्हाण यांनाच माहिती नव्हता. आपल्याला माहिती न देता, अधिका-यांनी असा प्रस्ताव तयार करुन, थेट मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरीसाठी सादर केला जातो, हे अत्यंत असमन्वयाचे लक्षण असल्याचे अशोक चव्हाण यांचे म्हणणे आहे.

अशोक चव्हाण यांनी यापूर्वीही आपली नाराजी व्यक्त केली होती. ठाकरे सरकारमध्ये काँग्रेसला योग्य स्थान नाही, अशी नाराजी चव्हाण यांनी व्यक्त केली होती.

एकमेकांची काळजी घ्यायला हवी : काँग्रेस
सरकारमध्ये काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीला अधिक महत्त्व दिल्याने आक्रमक झालेले काँग्रेस नेते आता बॅकफूटवर आले आहेत. आम्ही थोडी काळजी घेतली. एकमेकांची काळजी घेतली तर आघाडी सरकार अधिक भक्कम होईल, अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे काँग्रेस हतबल झाली असून बॅकफूटवर आल्याचे सूत्रांनी सांगितले.

यावेळी त्यांनी अशोक चव्हाण नाराज असल्याचे वृत्त फेटाळले. चव्हाण यांच्या नाराजीची बातमी पेरल्या गेली असावी. मी त्यांना भेटतो. आम्ही पक्षात एकत्र काम करत असल्याने त्यांच्याशी चर्चा करून योग्य नि

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post